Lok Sabha Election Nashik : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) अनेक इच्छुकांच्या नावाची चर्चा आहे. अशात स्वामी शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) नाशिकमधून (Nashik) लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शांतिगिरी महाराजांना महायुतीकडून (Mahayuti) उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी देखील पुन्हा लोकसभा लढवण्याची तयारी केली आहे. दरम्यान असे असतानाच जय बाबाजी भक्त परिवाराकडून सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून हेमंत गोडसेंचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.  


गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतिगिरी महाराज यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी गोडसेंनी महाराजांचे आभार मानत जय बाबाजी परिवार हा लाखांच्या आसपास असल्याने आपल्याला निश्चितच फायदा होईल असे म्हंटले होते. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांनी शांतिगिरी महाराजांना पाठिंबा देऊन राजकारणाच्या शुद्धीकरण चळवळीत यावे अशी मागणी जय बाबाजी भक्त परिवाराकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाते आहे. सोबत 2019 सालची महाराजांनी गोडसेंना पाठिंबा दिल्याची 'एबीपी माझा'ची बातमीही व्हायरल केली जाते आहे.



हेमंत गोडसे म्हणतात....


शांतिगिरी महाराजांमुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. तर, “ शांतिगिरी महाराजांमुळे तिकीट कापले जाणार नाही असा हेमंत गोडसे यांना विश्वास आहे. जे इच्छुक उमेदवार असतात ते प्रत्येक ठिकाणी भेटी घेत असतात. नीट विचार करून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असा विश्वास आहे. गेली 10 वर्षांपासून नाशिक लोकसभेचे नेतृत्व करतो आहे. संघटना बांधणी, विकासकामे केलेली आहे. मागे आम्ही शिवसेनेच्या 18 खासदारांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. या 18 जागा परत मिळवण्याचा आग्रह आहे, या 18 जागा मिळतील असा विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. नविन 5 उमेदवारही शिवसेनेत येतील, रवींद्र वायकर आले अजून धक्के मिळणार आहेत, असे हेमंत गोडसे म्हणाले आहेत. 


महायुतीकडून शांतिगिरी महाराजांना यामुळे मिळू शकते उमेदवारी?



  • भगवाधारी हिंदू चेहरा जो भाजप आणि शिंदे गटालाही अपेक्षित आहे.

  • आगामी कुंभमेळा नाशिकमध्ये होणार असल्याने महाराजांचा केला जाऊ शकतो विचार

  • महाराजांचा मोठा भक्तपरिवार असून ग्रामीण भागात अधिक मतदार आहे.

  • वर्षभरापासूनच शांतीगिरी महाराजांनी विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत एकप्रकारे प्रचाराला सुरुवात केली आहे. 

  • विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना पक्षातूनच मोठा विरोध असल्याची चर्चा


शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली....


मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत मोठ्या हालचाली होतांना पाहायला मिळत आहे. शांतिगिरी महाराजांच्या एन्ट्रीने नाशिकच राजकारण अधिकच तापलं आहे.  विशेष म्हणजे वर्षा बंगल्यावर जाऊन स्वामी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट देखील घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरीही उपस्थित होते. यावेळी महाराजांनी नाशिकमधून निवडणूक लढवण्याची इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे व्यक्त केली असून, यावर बरीच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


नाशकातून शांतिगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात? हेमंत गोडसे म्हणतात...