नागपूर : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची छेड काढली जाते ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी प्रसंग आहे. त्यांच्या नावातच रक्षा आहे. त्या अनुषंगाने कायद्यात काही त्रुटी आहे का, अधिवेशनात हा विषय मांडला गेला पाहिजे. तसेच याच्यामध्ये बदल केला पाहिजे. टवाळखोर लोक मुलींना त्रास देतात. गुन्हा जास्त गंभीर गुन्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ज्या पद्धतीने शिक्षा दिली, त्याच पद्धतीची शिक्षा अशा टवाळखोरांना दिली पाहजे. काही कायदे बदलण्यासाठी अशासकीय विधेयक मी सुद्धा मांडणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. मी मागेपुढे पाहत नाही. कुणी काय केलं यापेक्षा जो मिला ओ सही, जो मिला उसके साथ, आगे बढना है. असेही ते म्हणाले.
चौकशीत तथ्य असल्यावर मुख्यमंत्री कारवाई करतील- सुधीर मुनगंटीवार
करुणा मुंडे यांनी काय म्हटलं त्यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया द्यावी. सरकारच्या वतीने मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौकशीत तथ्य असल्यावर कारवाई करतील, थोडी वाट पाहिली पाहिजे. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. धनंजय मुंडे आज (3 मार्च) राजीनामा देतील, दोन दिवसांआधी धनजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे, असा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी काल शेअर केली होती. त्यामुळे आता खरचं धनंजय मुंडे राजीनामा देणार? की सरकार राजीनामा घेणार? असे सवाल उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार का, याकडे राजकीय वर्तुळासह साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावर बोलताना मुनगंटीवार यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिलीय.
आम्ही फोटो काढला नाही, तर गर्विष्ठ अशी आमची प्रतिमा होते- सुधीर मुनगंटीवार
राजकीय नेता म्हणून आम्ही फोटो काढला नाही, किंवा जर आम्ही कोणाला फोटो काढू दिले नाही तर गर्विष्ठ नेता अशी प्रतिमा आमची होते. अशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती संबंध ठेवत असेल तर आम्ही दूर राहिले पाहिजे. आम्हाला माहीत असेल हा गुंड प्रवृत्तीचा आहे. तर आम्ही त्याच्यासोबत फोटो काढता कामा नये. छत्रपती बद्दल बोलणाऱ्या लोकांवर पोलीस काय करते हे पाहत आहे. दरम्यान, फिक्सर बद्दल माझी प्रतिक्रिया कडक आहे. अशा फिक्सरची माहिती देणार कायदा केला पाहिजे, की त्यांना 50 लाखाचे बक्षीस दिले पाहिजे. डेस्क ऑफिसर आपलं आयुष्य उध्वस्त होईल म्हणून त्यावर बोलत नाही. कायदा केला पाहिजे. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
कापूस आणि सोयाबीनला मिनिमम सपोर्ट प्राईस मिळाली पाहिजे. विधानसभेत या विषयावर प्रश्न उपस्थित होईल. सरकारच्या वतीने यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मतदारसंघाच्या विषय मांडण्यासाठी आयुधाचा उपाय करणार आहे. विधानसभा अध्यक्षांना त्या विषयाने विनंती केली त्यांनी ती मान्य केली असल्याची प्रतिक्रिया ही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
हे ही वाचा