नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुकेश शहाणे यांनी केला होता. त्यानंतर, आता सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांच्या मुलाविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाख करण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर 3 वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराप्रकरणी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गेल्याच महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. आता, सुधाकर बडगुजर यांच्यां मुलासह इतर 6 जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांच्यां मुलावर मोक्का अंतर्गत ही कारवाई होत असून संघटित गुन्हेगारी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  


नाशिकच्या सिडको परिसरात तीन वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.  आरपीआय पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी  15 फेब्रुवारी 2022 रोजी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याच्या आरोपवारुन गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी 6 जणांना अटक तर, दीपक बडगुजर यास  याधी अटकपूर्व जामीन दखील मंजूर करम्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण?


याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत जाधव यांच्या हत्याप्रकरणानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप होता. दोन दिवसापूर्वी त्यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. विजय गायकवाड या नावाने धमकीचा फोन आला असून या प्रकरणी संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून ही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुकेश शहाणे यांनी केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. 


मुकेश शहाणेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. महिला आघाडीने आंदोलन केलं होतं. मुकेश शहाणे यांना अटक करा, असे त्यात म्हटले होते. आंदोलन केले त्याची ही प्रतिक्रिया आहे. महिला आंदोलनामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर काहीतरी करायचे म्हणून हे आरोप केले आहेत. धमकी देणारा तो व्यक्तीच सांगेल की कोणी सांगितले. कोणी धमकी द्यायला सांगितले, याचा पोलीस तपास करतील. पोलिसांवर मोर्च्याचे दडपण म्हणून हे सगळं सुरू आहे, असे सुधाकर बडगुजर यांनी यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हटलं होतं. 


हेही वाचा


नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप