एक्स्प्लोर

Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत रात्री मोठ्या घडामोडी, प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवलं, नेमकं काय घडलं?

Sudhakar Badgujar set to join BJP: सुधाकर बडगुजर हे आज सकाळी हजारो कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन नाशिकवरुन मुंबईला निघाले होते. मात्र, बावनकुळेंनी आपल्याला काही माहिती नसल्याचे वक्तव्य केल्याने संभ्रम

Sudhakar Badgujar Nashik: आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन नाशिकवरुन मुंबईला भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी निघालेल्या सुधाकर बडगुजर हे पक्षात येणार असल्याची बाब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना माहिती नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हात झटकले होते. परिणामी मोठा गाजावाजा करत नाशिकवरुन मुंबईकडे रवाना झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या भाजप (BJP) पक्षातील प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली होती. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला माहिती आणि संमती नसताना सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा पक्षप्रवेश कसा होणार, असा प्रश्न विचारला जात होता. परंतु, याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश हा ठरल्यानुसार दुपारी एक वाजताच पार पडेल, असे सांगितले जात आहे. 

काल रात्री उशीरा पक्षश्रेष्ठींच्या झालेल्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या घडामोडींची कल्पना कोणीही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली नव्हती. परिणामी मंगळवारी सकाळी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच अनभिज्ञ असल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? 

 सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजर काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांना रिकाम्या हातीच नाशिकला परतण्याची नामुष्की सहन करावी लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर सुधाकर बडगुजर यांना विचारले असता त्यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत बोलण्यास नकार दिला. मी मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल. सर्व ठरले आहे त्याशिवाय मी जातोय का?, असा प्रतिसवाल सुधाकर बडगुजर यांनी केला.

आणखी वाचा

सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्ते घेऊन पक्षप्रवेश करायला मुंबईला निघाले पण भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात मला माहितीच नाही

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget