Solapur Politics : सोलापूर जिल्हा दूध संघाचे (Solapur District Milk Association) संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय. माजी आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे (Ranjeet Shinde) हे जिल्हा दूध संघांचे अध्यक्ष होते. जिल्हा दूध संघातील (Solapur District Milk Association) आर्थिक अनियमित्ता आढळून आल्याने संघ बरखास्त करण्यात आलंय. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशान्वये दूध संघ बरखास्त करण्यात आला.
9 एकर जागेवर विना परवाना गाळे बांधण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर बरखास्तीची नामुष्की ओढावलीये. संचालक मंडळाच्या कार्यकाळात जागा विक्रीच्या निर्णयाशिवाय इतर सर्व बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अध्यक्ष असलेल्या रणजितसिंह शिंदे यांनी टेंभुर्णी येथील संघाच्या राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या 9 एकर जागेवर विना परवाना गाळे बांधण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.
पिशवी बंद दुधाची विक्री, उपपदार्थ निर्मितीचा दर्जा राखण्यात दुर्लक्ष
पिशवी बंद दुधाची विक्री, उपपदार्थ निर्मिती यासह इतर सर्व बाबतीत दर्जा राखण्यात संचालक मंडळाचे दुर्लक्ष झाल्याचे बोललं गेलं. संचालक मंडळातील काही सदस्यांच्या संस्थांचे पाणी घातलेले दूध संघास पुरवठा करताना उघडकीस आल्यानंतर संघ बरखास्त करण्यात आलाय.
सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेय
माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे हे जिल्हा दूध संघांचे अध्यक्ष होते.
जिल्हा दूध संघातील आर्थिक अनियमित्ता आढळून आल्याने संघ बरखास्त करण्यात आला
विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशान्वये संघ बरखास्त करण्यात आला.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर बरखास्तीची नामुष्की
संचालक मंडळाच्या कार्यकाळात जागा विक्रीच्या निर्णयाशिवाय इतर सर्व बाबीकडे दुर्लक्ष
अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी टेंभुर्णी येथील संघाच्या राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या 9 एकर जागेवर विना परवाना गाळे बांधण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका
पिशवी बंद दुधाची विक्री, उपपदार्थ निर्मिती यासह इतर सर्व बाबतीत दर्जा राखण्यात संचालक मंडळाचे दुर्लक्ष.
संचालक मंडळातील काही सदस्यांच्या संस्थांचे पाणी घातलेले दूध संघास पुरवठा करताना आले उघडकीस
इतर महत्त्वाच्या बातम्या