Madha Solapur Vanchit Candidate Property : वंचित बहुजन आघाडीचे माढा (Madha)  आणि सोलापूर लोकसभेचे (Solapur Lok Sabha)  उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. माढाचे उमेदवार रमेश बारसकर आणि सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले. हे अर्ज दाखल करण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. माढा आणि सोलापूरचे हो दोन्ही उमेदवार कोट्यवधी रुपयाचे मालक असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे.


दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार हे करोडपती असल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी जे शपथपत्र सादर केलंय त्यामध्ये माढाचे उमेदवार रमेश बारसकर यांच्याकडे अडीच कोटी तर सोलापूरचे उमेदवार राहूल गायकवाड दीड कोटीच्या संपत्तीचे मालक असल्याचे सांगितले आहे. राहुल गायकवाड यांच्याकडे 14 लाख 76 हजार रुपयांची जंगम मालमत्ता तर 1 कोटी 31 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातील 'वंचित'चे उमेदवार रमेश बारसकर यांच्याकडे 9 लाख 84 हजार रुपयांची जंगम मालमत्ता तर 2 कोटी 35 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 


सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत वंचित बहुजन आघाडीने पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शन केले. या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे समर्थक सहभागी झाले होते. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार रमेश बारसकर यांनी शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टिका केली. "शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पत्नी बाबतीत भाष्य केले. सुनेला परकी म्हणून देशाभरातील सुणांचे अपमान शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रतील स्वाभिमानी सुना राष्ट्रवादीला मतदान करतील का यबाबतीत शंका आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे माढ्याचे उमेदवार रमेश बारसकर यांनी केली. 


रमेश बारसकर, उमेदवार, माढा 



  • शिक्षण : बी. ए. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक 2021 

  • एकूण जंगम संपत्ती : 9 लाख 84 हजार 108 रुपये

  • स्थावर संपत्ती : 2 कोटी 35 लाख 5 हजार रुपये

  •  कर्ज : 16 लाख रुपये

  •  रोख रक्कम : 50 हजार रुपये

  •  वाहने कोणकोणती : 75 हजार रुपये किमतीची दुचाकी गाडी तसेच 70 हजार रुपये किमतीची स्कूटी

  •  सोने-चांदी: ब्रेसलेट 50 ग्रॅम, लॉकेट 50 ग्रॅम, अंगठी 10 ग्रॅम, असे एकूण किंमत सात लाख रुपये

  • पत्नीच्या नावे काय-काय? 

  • 15  हजार रुपये रोख, मणी मंगळसूत्र 10 ग्रॅम, कर्णफुले 15 ग्रॅम, पाटल्या 50 ग्रॅम, नेकलेस 40  ग्रॅम, गंठण 50 ग्रॅम, असे एकूण सोन्याची किमत १२ लाख हजार रुपये


राहुल गायकवाड, सोलापूर उमेदवार 



  • शिक्षण : विदेशी व्यापार या विषयात एमबीए पदवी

  • एकूण जंगम मालमत्ता : 17 लाख 76 हजार रुपये

  • स्थावर मालमत्ता : 1 कोटी 31  लाख रुपये

  • रोख रक्कम : 45 हजार रुपये

  • वाहने कोणकोणती : साडेपाच लाख रुपये किमतीची आलिशान चारचाकी गाडी, तसेच 64 हजार रुपये किमतीची दुचाकी

  • सोने-चांदी: सोने 10 ग्रॅम किंमत ६० हजार रुपये


हे ही वाचा :


Mahadev Jankar Property : स्वतःला फकीर म्हणणारे महादेव जानकर पाच कोटींचे मालक, अनेक जिल्ह्यात शेतजमीनी