मुंबई वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi)  चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत (BJP)  न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी (Sanjay Raut) नकार दिला, आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली, असं आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा (ABP Majha Tondi Pariksha) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले,  पाच जागेंचा प्रस्ताव होता, असं आम्हाला माध्यमे सांगत होती. आम्हाला ज्या वेळी अटी टाकल्या त्यावेळी भाजपसोबत न जाण्याची अट ही पचणारी अट होती. त्यामुळे हा माणूस आणि हा पक्ष बाहेर गेलेला बरा त्यामुळे दोन जागेवर बसले होते. सांगणारा व्यक्ती संजय राऊत होता. त्यांनी स्वत: सांगितले आम्ही लेखी लिहून देऊ शकणार नाही, आम्ही आमचे दरवाजे बंद करणार नाही. 


उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट असताना कागजाची काय गरज?, अंबादास दानवेंचा सवाल 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले,  मला असे वाटते हा सगळा विषय संपलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर स्वत: स्वतंत्रपणे लढत आहे. संजय राऊतांवर विरोधी पक्षाने सातत्याने टीका केली आहे.  संजय राऊत भाजपच्या, मोदींच्या विरोधात लढत आहे, टीका करत आहे. अशा वेळी कागदाला काय अर्थ राहतो.  मोदींच्या वक्तव्यावर देखील शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. आता कागद मिळणे आणि सह्या करणे याला काहीच अर्थ उरत नाही.  भाजपसोबत जायचे नाही हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले असताना कागदाची गरज काय?  त्यांच्या म्हणाल्या काही अर्थ नाही. ती महाविकास आघाडीची चर्चा होती. महाविकास आघाडी एकत्रीत राहिली पाहिजे ही भूमिका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सातत्याने मांडत होते. ही भूमिका सगळ्या देशाने, महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे त्याविषयीच्या प्रकाश आंबेंडकरांच्या वेगळ्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला आणि राऊतांना देखील  नाही.


प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


Prakash Ambedkar Video :



हे ही वाचा:


विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात: प्रकाश आंबडेकर