Maharashtra Guardian Ministers: मंत्रीपदे आणि खाते यांच्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता देखील पालकमंत्रिपदासाठी (Maharashtra Guardian Ministers List) पाहायला मिळत आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचं दिसत आहे. पुणे, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद फडणवीसांना हवं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
कल्याण अत्याचार घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया
दुर्दैवाने समाजामध्ये या घटना घडताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणजे न्यायव्यवस्थेने वेगाने न्याय देणे आणि दुसरीकडे समाजात जागृती होणे आवश्यक आहे. 95 टक्के घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होतात, हाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. मात्र, आता हा सामाजिक प्रश्नही झालेला आहे. समाजात महिला आणि मुलींबद्दल संवेदनशीलता येणे आवश्यक आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
घटनास्थळी पर्यटन करू नये
परभणीमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एखाद्या घटनेचं महत्त्व किंवा गांभीर्य तिथे कोण गेला आहे, त्यापेक्षा आपण त्याला कसं रिस्पॉन्स करतो यावरून ठरतं. प्रत्येकच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जावे असं होत नाही. घटना महत्त्वाची होती म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी केले होते. घटनास्थळी पर्यटन करू नये, असंही पुढे फडणवीसांनी म्हटलं आहे. तर बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असंं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
पालकमंत्रिपदावरून कुठे संघर्ष?
जिल्हा : ठाणे
एकनाथ शिंदे, शिवसेना
गणेश नाईक, भाजप
----------------------------
जिल्हा :जळगाव
गुलाबराव पाटील, शिवसेना
संजय सावकारे, भाजप
----------------------------
जिल्हा : बीड
पंकजा मुंडे, भाजप
धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : यवतमाळ
अशोक उईके, भाजप
संजय राठोड, शिवसेना
इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : सातारा
शंभुराज देसाई, शिवसेना
शिवेंद्रराजे भोसले, भाजप
जयकुमार गोरे, भाजप
मकरंद पाटील, राष्ट्रवादी
------------------------
जिल्हा :कोल्हापूर
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
प्रकाश अबिटकर, शिवसेना