Shrinivas Patil on Sharad Pawar, Satara : "शरद पवार साहेब आणि मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे शिष्य आहोत. त्यांनीच स्वप्न नगरी वसवली आणि हा शारदेचा आश्रम तयार झाला. शारदा या पवार साहेबांच्या मातोश्री आहेत. शरदचं चांदणं त्यांच्यामुळेच पडलेलं आहे", असे साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. साताऱ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद पवारही उपस्थित होते.
ब्रिटीश काळात मी पुण्यात होतो, तेव्हा गुन्हेगार जमातीच्या लोकांना डांबून ठेवायचे
श्रीनिवास पाटील म्हणाले, ब्रिटीश काळात मी पुण्यात होतो, तेव्हा गुन्हेगार जमातीच्या लोकांना डांबून ठेवायचे. त्यानंतर कुलूप लावायचे. त्याच्या चाव्या कोणाकडे तरी असायच्या. आदरणीय पवार साहेब मु्ख्यमंत्री होते. त्यांनी मला सांगितलं की हडपसरमध्ये अशा वस्त्या आहेत. मी म्हटलं काय करायचं. आम्ही ते मोडून टाकलं आणि त्यांच्या नावावर आम्ही जमिनी करुन टाकल्या. याचा साक्षीदार मी आहे. जे गुंतले होते त्यांनी पवार साहेबांनी सोडवलं. पवार साहेबांचा उत्साह अधिक वाढतोय. आपण सर्वांनी हाळी देऊया. हाळीतून कळी फुलवूया. तिला सुगंध देऊया, असंही श्रीनिवास पाटील म्हणाले.
माझ्यासमोर सैन्यातील मुलींच्या तुकडीने परेड केली होती
शरद पवार म्हणाले, मी संरक्षण मंत्री (Defense Minister) असताना एकदा मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी माझ्यासमोर सैन्यातील मुलींच्या तुकडीने परेड केली होती. तो सोहळा आटपून मी परत भारतात आल्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांना याबाबत कल्पाना दिली होती. मात्र चर्चे दरम्यान तिन्ही दलाच्या प्रमुखांचे याबाबत एकमत झाले नाही आणि ते मानायला देखील तयार नव्हते. मात्र असे असतानाही शेवटी मी याबाबत निर्णय घेतला आणि सैन्यात 18 टक्के मुलींना स्थान दिले.
महिलांना दिलेली जबाबदारी त्या जातीने लक्ष देऊन पार पाडतात
दिलेल्या कामावर अधिक लक्ष घालून जर काम केलं तर प्रत्येक जबाबदारी महिला लक्ष देऊन पार पाडत असतात. महिलांनी जर दुधाचे पातेलं गॅसवर ठेवलं तर ते उतू जाऊ नये यासाठी त्या लक्ष देऊन काळजी घेत असतात. तशाच पद्धतीने महिलांना दिलेली जबाबदारी त्या जातीने लक्ष देऊन पार पाडत असल्याचेही शरद पवार (Sharad Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या