Shrikant Shinde Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदार प्रशिक्षणासाठी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमधे विधानसभा सचिवांकडून विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी सर्व नवनिर्वाचित दिल्लीत दाखल झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shivsena Shinde Group MP Shrikant Shinde) यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना आज (10 फेब्रुवारी) रात्री घरी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आहे.
खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचं ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena UBT) काही नवनिर्वाचित आमदारांनाही स्नेहभोजनाच निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ठाकरेंच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी कोणीही स्नेहभोजनासाठी जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीत पोहोचलेल्या अनेक आमदारांनी आपण या स्नेहभोजनाला जाणार नसल्याचा सांगितलं आहे तर काही आमदारांनी आपल्याला निमंत्रणच आलं नसल्याचं सांगितलं आहे. तर बाबाजी काळे, वरूण सरदेसाई, गजानन लवाटे हे आपल्या मतदारसंघात असल्याकारणाने दिल्लीत नाहीत. त्यामुळे काही आमदारांना या स्नेहभोजनाचा निमंत्रण मिळाले नाही. दहा नवनिर्वाचित आमदार आहेत. त्यातील सात दिल्लीत आहेत तीन मतदारसंघात आहेत. मात्र एकत्रितरित्या कोणीही स्नेहभोजनाला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार-
१. सिद्धार्थ खरात (मेहकर)
२. गजानन लवाटे (दर्यापूर)
३. संजय देरकर (वणी)
४. अनंत (बाळा) नर (जोगेश्वरी पूर्व )
५. हरुन खान (वर्सोवा )
६. वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व)
७. महेश सावंत (माहीम)
८. मनोज जामसुतकर (भायखळा)
९. बाबाजी काळे (खेड आळंदी)
१०. प्रवीण स्वामी (उमरगा)
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची यादी (Uddhav Thackeray Shivsena MLA List)
1) मेहकर- सिद्धार्थ खरात
2) दर्यापूर - गजानन लवाटे
3) बाळापूर - नितीन देशमुख
4) वणी - संजय देरकर
5) परभणी - राहुल पाटील
6) विक्रोळी - सुनील राऊत
7) जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
8) दिंडोशी - सुनील प्रभू
9) वर्सोवा - हरुन खान
10) कलिना - संजय पोतनीस
11) वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
12) माहीम - महेश सावंत
13) वरळी - आदित्य ठाकरे
14) शिवडी - अजय चौधरी
15) भायखळा - मनोज जामसूतकर
16) खेड आळंदी - बाबाजी काळे
17) उमरगा - प्रवीण स्वामी
18) उस्मानाबाद - कैलास पाटील
19) बार्शी - दिलीप सोपल
20) गुहागर - भास्कर जाधव
संबंधित बातमी:
उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संपूर्ण यादी!