राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होणे स्वाभाविक आहे- प्रसाद लाड
दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. यावर बोलतांना भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपली प्रतिक्रिया देत ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची माहिती दिली आहे. राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा स्वाभाविक होणारच, यात दुमत नाही,असेही प्रसाद लाड म्हणाले.
राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये एक कॅफे उघडलाय- संजय राऊत
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे एक कॅफे उघडला होता एवढेच मला माहिती आहे. तिथे काही लोक सातत्याने चहापाण्यासाठी जात असतात आणि तो सर्वासाठी खुला आहे. किंबहुना राजकारणातली ही चांगली गोष्ट असून असे चहापान होत असतात. चांगला कॅफे असला तर लोक जात येत असतात त्यांना चांगला नजारा बघायला मिळतो, बसायला उत्तम जागा मिळते, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी भाष्य करत ही टीका केली आहे.
राज ठाकरे यांचा राजकीय वावर संपत चाललाय- सुषमा अंधारे
तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा राजकीय वावर संपत चाललाय. अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. राज ठाकरे कोणावर बोलतात आणि त्यांचाकडे कोण जात, याने आता फारसं महत्त्व राहिलेलं नाही. महाराष्ट्रातील जनतेलाच नाही तर मनसेच्या कार्यकर्त्यांना ही बाब माहिती झाली आहे. अनेकदा राज ठाकरे हे भाजप विरोधात भूमिका घेतात पण ज्यावेळी निवडणूका येतात त्यावेळी ते भाजप सोबत जवळीक साधताना दिसतात. त्यामुळे ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या
इतर महत्वाचा बातम्या
