नवी दिल्ली : संसदेत संविधानाला (Constitution) 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान संसदेत (Parliament) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संविधानावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे एक पत्र वाचून दाखवले. इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांना देशाचे 'महान सपूत' असे संबोधले होते. मग इंदिरा गांधी (Indira Gandhi) या संविधान विरोधी होत्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) बसलेल्या जागेवरून उठले आणि संसदेत राडा झाल्याचे दिसून आले. 


नेमकं काय घडलं? 


श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाआधी राहुल गांधी यांनी संविधानावर भाषण केले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य करत भाजपवर हल्लाबोल केला. भारतीय राज्यघटनेची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीही नाही, असे आपले नेते म्हणाले होते. ज्यांची तुम्ही पूजा करतात. हे सावरकरांचे शब्द आहेत. तुम्ही तुमच्या नेत्यांच्या शब्दांवर ठाम राहा. जेव्हा तुम्ही संसदेत राज्यघटनेवर बोलता तेव्हा तुम्ही सावरकरांची निराशा करता, असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला.


श्रीकांत शिंदेंचा जोरदार हल्लाबोल 


श्रीकांत शिंदे म्हणाले की, आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने कायमच संविधानाचा अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसच्या काळातच देशात शिख बांधवांचे खून झाले. तसेच कारसेवकांवर गोळीबार करण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. मुंबईमध्ये देखील बॉम्बस्फोट काँग्रेसच्या काळात झाले होते, असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला. इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देशाचे 'महान सपूत' असे संबोधले होते. मग इंदिरा गांधी या संविधान विरोधी होत्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर संसदेत मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Kirit Somaiya: 'आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही, ज्याने बापाचं नाव बुडवलं'; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल


Rahul Gandhi: उत्तर प्रदेशात मनुस्मृती लागू, जातीय जनगणना करून दाखवून देऊ कोणाचा किती अंगठा कापला; राहुल गांधींचा जोरदार प्रहार