Sanjay Raut :  हिंदु-मुस्लिम, भारत पाकिस्तान हा खेळ कुठपर्यंत चालणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. देशाला पुन्हा एकदा तोडण्याचा तुमचा विचार आहे का? देशाचं तुम्हाला विभाजन करायचंय का? असा सवाल करत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. देशाचं नुकसान होत असल्याचेही राऊत म्हणाले. हिंदुत्वाची आम्हाला ज्यादा चिंता आहे. नकली लोकांना चिंता नाही. बेईमान असलेली लोकं आम्हाला नकली म्हणत असल्याचे राऊत म्हणाले. 


बेईमान असलेली लोकं आम्हाला नकली म्हणत असल्याचे राऊत म्हणाले. ज्यांनी शत्रुंशी हात मिळवणी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला ते आम्हाला नकली म्हणत असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, साताऱ्यात आणलेल्या वाघनखे याबाबतही राऊतांनी प्रतिक्रिया दिली. वाघनखांवर बेईमान लोकांनी बोलू नये. छत्रपती शिवरायांनी जर ही वाघनखं वापरली असतील तर आम्ही त्या वाघनखाला प्रमाण करतो. पण इतिहास सांगतो, तज्ज्ञ सांगतात की ही वाघनखे शिवाजी महाराज यांनीच वापरलेली आहेत का? याविषयी कोणतीही खात्री नाही असे राऊत म्हणाले. 


सत्तेत सामील झालेले सहयोगी पक्ष हे सत्तेच गुलाम


भाजबरोबर सत्तेत सामील झालेले सहयोगी पक्ष हे सत्तेच गुलाम असल्याची टीका देखील राऊतांनी केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, चिराग पासवान यांनी समोर येऊन त्यांची भूमिका सांगावी असंही राऊत म्हणाले. 
भाजपचं चारित्र्य काय आहे? हे पाहण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांची डीएनए टेस्ट करा असेही राऊत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी