मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यानंतर आता महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुन्नाभाईसारखी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाने मनसे आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


हा राजकारणातील मुन्नाभाई! 


उद्धव ठाकरे या भाषणामध्ये म्हणाले, ''मला शिवसैनिकाने विचारलं, तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? त्याच्यात नाही का गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. तशी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात कधी, मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. चित्रपटातला मुन्नाभाई किमान लोकांची मदत तरी करत होता. त्यातलं एक लक्षात घ्या, शेवटी त्या मुन्नाभाईला कळत ही, आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत, तर फिरू द्या.''


शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं






शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा


शिवसेनेनं सोशल मीडियावरून राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. आणखी एका एक्स मीडिया म्हणजे ट्वीटर पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही! आमच्या मातीचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणाने जपायचाय! हा स्वाभिमान जपण्यासाठी, सदैव धगधगत राहणार ठाकरेंची मशाल! यासोबत उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, ''महाराष्ट्र हा लेच्या-पेच्यांचा नाही, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मर्दांचा प्रदेश आहे. आपल्याया आपल्या महाराष्ट्राची ओळख तिच ठेवायची आहे, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा. आता जे चाललंय ते, गुंडांच्या, लाचारांच्या, नामर्दांच्या देशा, अशी महाराष्ट्राची ओळख नाही.''


शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sushma Andhare : कोल्ह्याला द्राक्षे आंबट! राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, आमचा विश्वास वाढवणारा; सुषमा अंधारे यांची खोचक टीका