Sevak Vaghaye on Nana Patole : भंडारा : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra News) माझीच खरी काँग्रेस (Congress), राहुल गांधींना (Rahul Gandhi) भेटून पाठिंबा मागणार, असं वक्तव्य अपक्ष उमेदवार सेवक वाघाये (Sevak Vaghaye) यांनी केलं आहे. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नाना पटोलेंनी (Nana Patole) माझी राजकीय हत्या केलीय, असा घणाघाती आरोप सेवक वाघाये यांनी केला आहे. मला डावलून काँग्रेसनं नवख्या डमी उमेदवाराला रिंगणात उतरवलं, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंना जिंकवण्यासाठी पटोलेंनी खेळी खेळल्याचा आरोप सेवक वाघाये यांनी केला आहे. तसेच, महायुतीचे (Mahayuti) उमेदवार खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) हे पटोले यांचे नातेवाईक, असल्याचंही सेवक वाघाये म्हणाले आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार आणि लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणाले की, "काँग्रेस पक्षाचा मी तीन वेळेस आमदार झालो. यावेळी मी लोकसभेची उमेदवारी मागितली असता, मला डावलून काँग्रेसनं एका नवख्या डमी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझा पॉलिटिकली मर्डर केला आहे. महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे नाना पटोले यांचे नातेवाईक असून त्यांना जिंकविण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ही खेळी खेळली."
माझा जनाधार वाढत असून प्रफुल्ल पटेलसुद्धा मला घाबरतात : सेवक वाघाये
सेवक वाघाये यांचीच खरी काँग्रेस असून 13 एप्रिलला राहुल गांधी यांची साकोली इथं सभा होत आहे, या सभेत राहुल गांधी यांच्याकडे मी समर्थन मागणार असल्याचंही सेवक वाघाये म्हणाले. माझा जनाधार वाढत असून प्रफुल्ल पटेल हे सुद्धा आता मला घाबरतात, असंही सेवक वाघाये म्हणाला.
खरी लढाई बेईमानांविरुद्ध इमानदारीची : सेवक वाघाये
महायुतीच्या उमेदवाराची खरी लढत अपक्ष सेवक वाघाये यांच्यासोबत असल्याची वक्तव्यही आता भाषणातून केली जात आहेत. आता ही लढाई बेईमानांविरुद्ध इमानदारीची लढाई आहे. जनताच माझे भगवान असून तेचं मला निवडून देतील, असा विश्वास सेवक वाघाये यांनी व्यक्त केला केला आहे.