Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group Lok Sabha Candidate List : मुंबई : ठाकरे गटाची (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group) पहिली यादी आज जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसंच या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असेल, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून (Saamana) अधिकृत घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेत्यांकडून रणनीती आखण्यात आली आहे. याशिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटप संदर्भात देखील 2 तास विस्तृत चर्चा झाली. 


राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागावाटप पूर्ण झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी याबाबत ठाकरे आणि पवारांमध्ये विस्तृत चर्चा झाली असल्याची माहितीही समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी? यासोबतच राज्यात लोकसभेसाठी  संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचं नियोजनसुद्धा या बैठकीत झाल्याचं कळत आहे. 


ठाकरेंचे संभाव्य उमेदवार कोण असतील? 



  • दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ : विद्यमान खासदार अरविंद सावंत 

  • उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ : अमोल किर्तीकर 

  • उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ : संजय दीना पाटील 

  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : अनिल देसाई 

  • रायगड लोकसभा मतदारसंघ : अनंत गीते 

  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : विनायक राऊत 

  • ठाणे लोकसभा मतदारसंघ : राजन विचारे

  • धाराशिव लोकसभा मतदारसंघ : ओमराजे निंबाळकर 

  • परभणी लोकसभा मतदारसंघ : संजय जाधव 

  • सांगली लोकसभा मतदारसंघ : चंद्रहार पाटील 

  • मावळ लोकसभा मतदारसंघ : संजय वाघोरे

  • शिर्डी लोकसभा मतदारसंघ : भाऊसाहेब वाकचौरे 

  • बुलढाणा लोकसभा मतदारसंघ : नरेंद्र खेडेकर 

  • हिंगोली लोकसभा मतदारसंघ : नागेश पाटील आष्टेकर 

  • छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ : चंद्रकांत खैरे 

  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : संजय देशमुख 


शिंदेंच्या शिवसेनेला 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रावादीला 4 जागा : सूत्र 


महायुतीत लोकसभेच्या दोन जागांवरुन तिढा कायम आहे. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरु आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे.. तर नाशिकच्या जागेवरुन तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळतेय. ठाणे, नाशिक सोडून महायुतीचं संभाव्य जागावाटप माझाच्या हाती आलंय. महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रावादीला 5 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रत्नागिरीचीही जागा भाजपकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय.