Ambadas Danve : आजपर्यंत अनेक पक्ष सोडून गेले असले तरी संघटना टिकून आहे. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तरी ते पक्षावर नाराज नाहीत.
त्यांच्यावर पक्षांच्या मोठ्या जबाबदाऱ्या असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलं. भास्कर जाधव यांच्याशी पक्ष प्रमुखांचा नेहमी संपर्क राहिला आहे. आज ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंग वरुन बैठकीला हजर होते, असंही दानवे म्हणाले. तसेच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी भेट होतं असेल तर हे दुर्देवी आहे. सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे, आता याला तडा जाईल असंही दानवे म्हणाले.
सदस्य नोंदणी ते संघटना मजबूत करणे यावर बैठकीत चर्चा
मंत्री धनंजय मुंडेंवर काय कारवाई केली? लाडकी बहिण, लाडके भाऊ योजनेची वाट लागली आहे असंही दानवे म्हणाले. सर्वच राजकीय पक्षात परिवारवाद आहे. सर्वांची पोरं राजकारणात आहेत असं दानवे म्हणाले. ठाकरे गटाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर काही महत्वाच्या नेत्यांची आज बैठक संपन्न झाली. यानंतर दानवे बोलत होते. संघटनेच्या कामजाची ही बैठक होती. सदस्य नोंदणी सुरु झाली आहे. संघटना मजबूत करण्यासाठी कसे सक्रिय झाले पाहिजे याबाबत देखील चर्चा झाल्याचे दानवे म्हणाले. संघटना कुणासाठी थांबत नाही. आजपर्यंत अनेकजण पक्ष सोडून गेले असले तरी संघटना टिकून आहे असे दानवे म्हणाले. विधानसभेला राजन साळवी यांचा का पराभव झाला, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे असेही दानवे म्हणाले.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट होतं असेल तर हे दुर्देवी
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट होतं असेल तर हे दुर्देवी आहे असंही दानवे म्हणाले. सुरेश धस यांनी आत्तापर्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे, त्याला आता तडा जाईल. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी सर्व जनता रस्त्यावर उतरली आहे असंही दानवे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत,अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत व इतर काही नेते उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात होणारे प्रवेश पाहता डॅमेज कंट्रोलसाठी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार होते.
महत्वाच्या बातम्या:
Eknath Shinde : ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं, त्यांचाही अपमान करताय, जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा; शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला