Mumbai News : मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना न्यायालयाने मोठा निर्णय देत दणका दिला आहे. अँटिलिया स्फोटकं प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टाने नकार नोंदविला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, 20 जिलेटिन स्टिक असलेली बॅग अँटिलियाबाहेर आढळली होती. त्यात अंबानी कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी चिठ्ठी एक महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये सापडली होती. या प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली असून या स्फोटकं प्रकरणात कोर्टाने आज (15 फेब्रुवारी) मोठा निर्णय दिला आहे.
प्रदीप शर्मा यांची कारकिर्द काय?
प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झाले.
प्रदीप शर्मा यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त राहिली.
प्रदीप शर्मा यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख
लखन भैय्या बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध प्रकरणात 2008 मध्ये निलंबित
2019 मध्ये शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र प्रदीप शर्मा यांचा दारुण पराभव झाला होता.
अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.
अँटिलिया स्फोटकं प्रकरण नेमकं काय?
25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कार प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. कारण यानंतर अनेक नाट्यमय घटना घडत गेल्या होत्या. उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. नंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली होती.
मनसुख हिरण याचा मृतदेह 5 मार्च 2021 ला मुंब्य्राजवळील खाडीत सापडला होता. त्यानंतर मनसुख हिरण याची हत्या सचिन वाझेंनीच केल्याचा आरोप त्याच्या कुटुबीयांकडून करण्यात आला होता. हा तपास एटीएसकडून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्यात आला. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे, प्रदीप शर्मासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या