Sanjay Gaikwad : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खळबळजनक दावा केलाय.  


संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोन मंत्र्यांचा अप्रत्यक्ष समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत संजय गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, कुठला मंत्री या घटनेत सहभागी असेल, याबाबत मला सांगता येणार नाही. मात्र लोकांना दिसत आहे की, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा आहे, त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही, असा उल्लेख केला होता. तो खंडणीखोर आहे. या प्रकरणात त्याने दोन कोटीचे खंडणी मागितली आणि त्यानंतर हे पुढचे प्रकरण घडले. संतोष देशमुख यांचा खून झाला.


बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब


बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा विषय गंभीर आहे. बुलढाणा जिल्ह्यात 942 बंदुकीचे लायसन्स आहेत. एकट्या बीडमध्ये 1222 बंदुकीचे लायसन्स आहेत. तिथे लोक खुलेआम बंदुका चालवतात असे म्हणत 1992 साली एका राजकीय नेत्याच्या घरून एक आयएएस अधिकारी गायब झाले. ते अद्यापपर्यंत सापडलेले नाहीत, असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून नेमका तो राजकीय नेता कोण ? गायब झालेला आयएएस अधिकारी कोण ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 


बीडमध्ये कुणाचेही कंट्रोल नाही


बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे स्वरूप प्रचंड आहे. तिथे कुणाचेही कंट्रोल नाही. महाराष्ट्रात गुन्हेगारीत सध्या बीड जिल्हा हिटलिस्टवर आहे. जनतेच्या मनात प्रचंड राग आहे की हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे आज सगळ्याच्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन बीमध्ये मूक मोर्चा काढला, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा


अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार