Sambhajiraje Chhatrapati on Dhananjay Munde : अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, असा थेट हल्लाबोल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. अजितदादा तुमची काम करण्याची पद्धत ही परखडपणाची असेल तर आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा असे संभाजीराजे म्हणाले. मला माहित नाही त्यांचा राजीनामा घेतील की नाही. पण बीडच्या सगळ्या जनतेला मला सांगायचं आहे की, त्यांना जर (धनंजय मुंडे) पालकमंत्रीपद दिलं तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व गेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आम्हाला दहशत नाही. दहशत चालत असले तर माझं इथं येणं कर्तव्य असल्याचे संभीजीराजे म्हणाले. बीडचा बिहार करायचा आहे का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी केला. 


बीडची दहशत संपवली पाहिजे 


संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या विरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्यावेळीसंभीजीराजे बोलत होते. हा मोर्चा बघा सर्व जातीय लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. एवढ्या उन्हात हजारो लोकं बसले आहेत. एकजण देखील उठून गेलेला नाही. पत्र्याच्या छतावर लोकं बसले आहेत. संतोष देशमुख यांच्यासाठी, माणुसकीसाठी हे लोकं बसले आहेत. बीडची दहशत संपवली पाहिजे असेही संभाजीराजे म्हणाले. मंत्री महोदय स्वतः बंदूक हातात घेतात. आम्हाला बंदुकीची परवानगी आहे, पण आम्ही कधी दाखवली का? असेही संभाजीराजे म्हणाले. 


संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्यासोबत


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्हाला पारदर्शकपणे काम करणारा अधिकारी द्या असेही संभाजीराजे म्हणाले. माणुसकी जपण्यासाठी हे सगळं लोक इथं जपले आहेत. राजकाराणाच्या पलिकडे जाऊन आपण विचार करु असेही संभाजीराजे म्हणाले. बीड जिल्ह्यात सुरु असलेली दहशत संपली पाहिजे असेही संभाजीराजे म्हणाले. आमच्या रक्तात बंदुक धरणे, तलवार धरणे आहे, पण आम्ही कधी दाखवलं का? असेही संभाजीराजे म्हणाले. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्यासोबत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 


दरम्यान, आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या विरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिले होते. तसेच यावेळी सर्वच पक्षाचे नेते देखील उपस्थित होते. सर्वांनीच या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अषी मागणी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले