Maharashtra Politics : शिवसेनेच्या (Shiv Sena) पक्ष निधीवरून पुन्हा एकदा राजकारण पाहायला मिळणार आहे. शिवसेनेच्या पक्ष निधी (Shiv Sena Party Fund) प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे. ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून पैसे काढल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.


शिवसेना पक्ष निधीवरून पुन्हा राजकारण


शिवसेना शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर करण्यात आले. तरीही शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून सुमारे 50 कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार शिवसेना  शिंदे गटाकडून करण्यात आली होती. यासंबंधी शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.


शिवसेना पक्ष निधी प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून


शिवसेना पक्षाचे निधी संबंधीचे  हे खाते कोण चालवते? आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्यातून पैसे कोणी काढले याची माहितीही मागवण्यात आली असून बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.


निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यापासून शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या पक्षाचा कर कोण भरत आहे, याची माहिती घेण्यासाठीआर्थिक गुन्हे शाखेकडून आयकर विभागाला पत्र पाठवले आहे.


निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये  एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे घोषित केले होते आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आले होते. त्यामुळे पक्षनिधीतून काढण्यात आलेल्या निधीवरून हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.