Assembly Speaker Rahul Narwekar: विधीमंडळाची भूमिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मांडली जाईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, सातत्यानं आरोप करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही राहुल नार्वेकरांनी टीकास्त्र डागलं आहे. अध्यक्षांना राजकीय फासावर लटकवा, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्यावर बोलताना राहुल नार्वेकरांनी संजय राऊत म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे का? असं म्हणत त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावं, असं म्हटलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणी दिरंगाई यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, "आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि काही वेळातच या संदर्भात सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे, सर्वप्रथम मांडली जाणार आहे, सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की, नेमकं नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झालं आहे, ते जर समजलं नाही, तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल? त्यामुळे मला वाटतं सुनावणी झाल्यानंतर याबद्दल जास्त स्पष्टता प्राप्त होईल."
संजय राऊत म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे का? : राहुल नार्वेकर
संजय राऊत सातत्यानं गंभीर आरोप करत आहेत. त्याबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले आहेत की, "बिनबुडाचे आरोप ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकावा आणि आपल्याला हवं तसं घडवून घ्यावं, याच हेतूनं केले जातात. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय, असं मला वाटतं. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. यांचं अस्तित्वात अशा न्यूज कमेंट करून टिकतं, अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावं? आणि त्यांना का महत्व द्यावं? संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे, काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही. त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावं."
"संजय राऊत यांना जर विधिमंडळाचे नियम समजले असते, तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची जर त्यांना माहिती असती, तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. आपल्याला सांगितल्याप्रमाणे संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही.", असं म्हणत राहुल नार्वेकरांनी राऊतांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
"एक तुम्ही लक्षात घ्या, आता जवळजवळ तीन सुनावण्या झाल्यात, त्या विषयातल्या सुनावण्या ज्या वेळेला होत होत्या, त्या वेळेला तीन-तीन अर्ज कोणी दाखल केले? याचिका दरांनीच. आता मूळ अर्जांवर सुनावणी न घेता आपण पुढे जाऊ शकतो का? तर वेळ काढू पणा कोण करतंय? हे जर आपण ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला समजेल. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर खरंतर 13 तारखेची सुनावणी होती, मला दिल्लीला काही कार्यक्रम असतो, तिथं जाणं आवश्यक होतं. मी ती सुनावणी पुढे ढकलून जाऊ शकत होतो. परंतु तसं न करता मी ती सुनावणी एक दिवस आधी घेतली, कारण मला जे वेळापत्रक बनवलेलं त्यात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नव्हती. परंतु, केवळ हेतूपुरस्पर एकूण दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी जर का असे आरोप केले जात असतील, तर या आरोपांचा मी दखल घेत नाही आणि घ्यायची गरजही नाही.", असं राहुल नार्वेकर म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :