Maharashtra Politics: शिवसेनेतील (Shiv Sena Crisis) बंडानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharshtra Political Updates) अभूतपूर्व कलाटणी मिळाली. गेल्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपनं (BJP) युती म्हणून लढवलेल्या, आता त्याच 22 जागांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं दावा केला आहे. शिंदे गटाबरोबर (Shinde Group) असलेल्या 13 खासदारांसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारीही भाजपनं दाखवली असून तशी योजनाच आखण्यात आली आहे.


शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी थेट 22 जागांवर दावा करण्यात आल्यामुळे महायुतीमधील जागावाटप अर्थातच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप आणि अजित पवार गटासोबत चर्चा करूनच जागा वाटपाचं सूत्र ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत अजित पवार गटाची भूमिका काय असणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर यासंदर्भात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट एकत्र चर्चा करुन मार्ग काढेल, असं राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी म्हटलं आहे. 


शिंदे गटातील विद्यमान खासदारांची जागा सोडणार नाही, राहुल शेवाळेंकडून स्पष्ट 


शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या 22 जागांवरचा दावा कायम आहे. तसेच, समर्थक तेरा खासदारांच्या जागांवर पुन्हा लढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत सर्व 22 जागांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मंत्र्यांची नेमणूक करून त्यांना जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे. प्रत्येक मंत्र्याला एक किंवा दोन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत चर्चा करूनच जागा वाटपाचं सूत्र ठरवणार असल्याचंही राहुल शेवाळेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे विद्यमान खासदारांची जागा सोडणार नाही, हेदेखील राहुल शेवाळेंनी स्पष्ट केलं आहे. 


शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा जागा वाटपाबाबत बोलताना सांगितलं की, "गेल्या लोकसभेत शिवसेनेनं ज्या 22 जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या 22 जागांपैकी तटकरेंची जागा आहे, त्याठिकाणी गितेंनी निवडणूक लढवली होती. त्यासंदर्बातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे एकत्र निर्णय घेतील. आढळराव पाटलांनी निवडणूक लढवली होती, त्यासंदर्भातील निर्णयही चर्चेतून घेतला जाईल. 13 खासदारांबाबतचा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही. कारण ते 13 खासदार आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर ठाम, आधीचंच वेळापत्रक सादर करणार, 'ABP माझा'ला खात्रीलायक सुत्रांची माहिती