Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार (Shiv Sena) अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court) सुनावणी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे गटाने दाखल केली होता. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी


महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेनेची 2018 सालची घटना मान्य करण्याची मागणी फेटाळत त्यांच्याविरोधात निकाल दिली होता. या निकालाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. शिंदेंचे आमदार पात्र, खरी शिवसेना शिंदेंची असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला होता. या अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.


एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सगळेच आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष ‘खरी शिवसेना’ असल्याचा निवाडा दिला. वेगवेगळ्या मुद्यांवर शिंदे आणि ठाकरे गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे या निकालानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरले. 


शिंदे आणि ठाकरे गटाकडून याचिका


ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तर शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी 7 मार्च ही तारीख सुनावणीसाठी देण्यात आली.  सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी व्हावी की हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवावं, या प्रश्नावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. 


आमदार अपात्रता प्रकरण हायकोर्टात जाणार?


भरत गोगवले हायकोर्टात गेले, त्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. तर, सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात गेले, त्याप्रकरणीही नोटीस बजावण्यात आली आहे. आज ठरेल या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात चालेल की सर्वोच्च न्यायालयात यावर आज चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण, एका प्रकरणावर दोन न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी! मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर..., शिंदे गटाचा भाजपला इशारा