Pratap Sarnaik मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. त्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. हे खातेवाटप येत्या दोन-तीन दिवसांत पार पडेल, अशी माहिती पुढे आली आहे. या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट मंत्री असल्यामुळे खातेवाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे. खातेवाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिकारातील विषय आहे. तेच यासंदर्भात निर्णय घेणार आहेत, तर खाते वाटपामध्ये कोणताही तिढा नाही खाते वाटपात कोणताही समन्वय नाही, असा कोणताही विषय नाही तिन्ही नेते एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील, असे मत शिवसेना आमदार उदय सामंत (Uday Samant)यांनी व्यक्त केलं आहे.
खाते वाटपामध्ये कोणताही तिढा अथवा पेच नाही- प्रताप सरनाईक
अशातच खाते वाटपाबाबत अद्याप तिढा असल्याच्या राज्याच्या राजकारणात चर्चा असताना उदय सामंत यांच्या पाठोपाठ आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी गृहखात्यासंदर्भात भाष्य केलं आहे. खाते वाटपामध्ये कोणताही तिढा अथवा पेच नाही. खाते वाटपात कोणताही समन्वय नाही असा कोणताही विषय नाही. तिन्ही नेते एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील, तसेच गृहखात्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं ही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
गृहखातं द्यायला तयार असतील तर काही हरकत नाही- प्रताप सरनाईक
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना एक दिवस नाही तर दररोज अधिवेशनात यावे, असा सल्लाही शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. सोबतच जे नाराज आमदार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी सर्वतोपरी मदत आतापर्यंत केली आहे, आणि या पुढे ही एकनाथ शिंदे त्यांना सोडणार नाहीत. तर त्यांनी देखील श्रद्धा आणि सबुरी ठेवावी असा सल्ला देखील त्यांनी नाराज आमदारांना दिला आहे. काही महत्त्वाची विषय सांगण्यासाठी आमदारांची आणि मंत्र्यांची ओळख होण्यासाठी आज विधानभवनात बैठक बोलवण्यात आल्याचे देखील प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. खातेवाटप संदर्भात कुठलाही पेच नाही. दोन दिवसात निर्णय होईल असं मुख्यमंत्री यांनी सांगीतले होते. गृहखात्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे निर्णय घेतील. तसेच ज्यांच्याकडे गृहखातं आहे ते द्यायला तयार असतील तर काही हरकत नाही. सभापती पदासाठी एकनाथ शिंदे सर्वस्वी निर्णय घेतील, असेही प्रताप सरनाईक म्हणाले
आणखी वाचा
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?