बारामती : एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना इशारा (NCP Workers) दिला आहे. काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Group) या दोन्ही पक्षांमध्ये कधी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) तर, कधी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) दिसतात, असं सांगत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मी असा दावा करणार नाही की 100 टक्के कामे झालं. पण आमच्या हातात ज्यावेळेस सूत्र आली, तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. मी पुन्हा सांगतो, बाबांनो भावनिक होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी
काहीजण दादा आले की, दादांच्या पुढे पण हलगी वाजत असतात. फटाके वाजत असतात आणि दादाला दिसेल, असं पुढे चालत असतात आणि दादांची पाठ फिरली आणि दुसरे आले की, त्यांच्याबरोबर असतात, अरे काय चाललंय तुमचं. एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, हे काय लावलाय चाटाळपणा, नेमकं काय करायचं ते ठरवा, असं म्हणत अजित पवारांनी दोन्ही पवारांच्या मागे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. बारामतीत सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ब्रेकिंगला मुद्दा द्यायचा नाही
अजित पवार यांनी यावेळी म्हटलं की, काही झाकून राहत नाही, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. त्या निंबोडे गावामध्ये घोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता आणि आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय तिथं करावं, काय धरणात, या वाक्यामुळे माझे वाटोळे झालं. परत कानाला खडाच लावला कॅमेरा असो-नसो सारखे मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचे शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, मुद्दा ब्रेकिंगला द्यायचा नाही, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन
माणूस चुकतो जो काम करतो तो चुकतो. मी बोलतो म्हणून शब्द गेला परंतु कायम गेला नाही त्याकरता माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणे, आता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघेही नाही आणि त्याच्यामुळे आता चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या बारामतीत आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं, हे तुम्ही ठरवा, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, लक्ष्मी म्हणून समजतात, कुणाच्याही घरामध्ये सून आली तर सासू काही दिवसांनी तिच्या हातामध्ये चावा देतात ना आणि सगळे आता तू बघ आणि चुकले तर ती सुनेला सांगते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
भावनिक होऊ नका
अजित पवार पुढे म्हणाले, आईच्या पोटामधून कोण शिकून येत नाही, मी पण नाही आलो, पहिले 84 ला मी भाषण करायचो माझे पाय लटलट कापायचे. त्या लिंबाकडे बघून भाषण करायचं आणि ते लिंबाकडे माणसं बघायची, तिथे माकड बसले का, काय बसले. जिरायती पट्ट्यात फिरत असताना, रस्ते माहीत नव्हते, ही अवस्था होती माझी, म्हणून माझे सांगणे बाबांनो आज भावनिक होऊ नका, असं आवाहान अजित पवारांनी केलं आहे. दुष्काळ जाहीर केला, बारामतीत आणि वाड्यांना आता पाणी चालू आहे, असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.