Amol Kolhe On Sharad Pawar : शिरुर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शरद पवारांचे सोमवारचे (6 मे 2024) सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज शिरुर मतदारसंघात (Shirur Constituency) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शिरुर मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार होते. परंतु शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं ही सभा रद्द करण्यात आली आहे. यावर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


विरोधकांनी फार खूश होण्याचं कारण नाही : अमोल कोल्हे 


अमोल कोल्हे म्हणाले की, "पवार साहेब उन्हात तीन-तीन चार-चार सभा घेत आहेत. मीही सभा घेत असताना काय त्रास होतोय, याची मला जाणीव आहे. पवार साहेबांना उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एक दिवसाचा आराम करून ते पुन्हा जोमानं सभा घेतील आणि आम्ही प्रचार करू, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.


कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानं देशातील व्यापाऱ्यांना कसलाच फायदा होणार नाही : अमोल कोल्हे 


केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी उठवली असून यावरही अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "केंद्रानं कांदा निर्यात बंदी उठवली असली, तरी ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारी असल्याचं शिरूर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. केंद्रानं कांदा निर्यात बंदी उठवली आहे, मात्र इतर देशातील कांद्याचे भाव आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याचे भाव यामध्ये तफावत आहे. पाकिस्तान बांगलादेश नेपाळ या देशातून निर्यात होणाऱ्या कांद्यापेक्षा भारतातील कांद्याचा निर्यात दर हा 65 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे कांदा आयात करणारे देश इतर देशातून कांदा आयात करतील, परिणामी देशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा कसलाही फायदा होणार नाही."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maval Lok Sabha Election: मावळ लोकसभेत प्रचारासाठी सुपरस्टार गोविंदा आला खरा, पण श्रीरंग बारणेंचं नाव विसरून त्यानं बल्ल्या केला