एक्स्प्लोर

Anil Desai On Shinde Group : शिंदे गट जे बोलून दाखवतो तेच त्यांना मिळतं : अनिल देसाई

Anil Desai On Shinde Group :"शिंदे गटाने मागावं, विचारावं ते आधीच ठरलेलं आहे की काय अशी शंका मनात येते. ते जे म्हणतील तेच होतंय. त्यांचं आणि या संस्थांच्या विचारांचं गणित एवढं जुळतंय की हा सुद्धा एक चमत्कारिक प्रश्न प्रत्येकाचा मनात निर्माण होतो," असं अनिल देसाई म्हणाले.

Anil Desai On Shinde Group : शिंदे गटाला (Shinde Group) जे जे हवं ते सगळं कसं मिळतं? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी विचारला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) काल (10 ऑक्टोबर) ठाकरे आणि शिंदे गटाचं नाव जाहीर केलं. तसंच ठाकरे गटाच्या चिन्हावरही शिक्कामोर्तब केलं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने अनिल देसाई यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर थेट हल्लाबोल केला.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देऊन मशाल या चिन्हावर शिक्कामोर्तब केलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे देत चिन्हासाठी नवीन पर्याय देण्याची सूचना केली. शिंदे गटाकडून आता तळपता सूर्य, तलवार-ढाल आणि पिंपळाचं झाड अशा तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. आता निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेणार आहे.

'स्वायत्त संस्थांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रिया सुद्धा पाहाव्यात'
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत विचारलं असता अनिल देसाई म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही स्वीकारला आहे पण या स्वायत्त संस्थांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रिया सुद्धा पाहायला हव्यात अशी अपेक्षा आहे. भारताच्या लोकशाहीचा कणा असलेल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी पाहावं. समाज काय म्हणतो याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे.

'ते जे बोलतात ते त्यांना सगळं मिळतंय'
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनिल देसाई सर्वप्रथम निवडणूक आयोगाकडे गेले आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचा गैरवापर होऊ नये यासाठी अर्ज केला होता, यावर "कायदेशीर बाबींबद्दल आम्ही लीगल काऊन्सिलसोबत बोलत आहोत. या दृष्टीने गरजेची पावलं आम्ही नक्कीच उचलू. परंतु एक उघड आहे, ते जे बोलतात त्याप्रमाणेच घडतंय आणि ते त्यांना सगळं मिळतंय," असं देसाई म्हणाले.

नाव आणि चिन्हावर समाधानी आहोतच. पण महत्त्वाचा मुद्दा असा की सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. त्यांचा निर्णय होणं बाकी आहेत. त्यात निवडणूक आयोगाने असा निर्णय दिलाय. इथे संविधात्मक पेच नक्कीच निर्माण होतो. खूप विरोधाभास आहे, असा अनिल देसाई यांनी नमूद केलं. 

शिंदे गटाचे आणि निवडणूक आयोगाचे विचार इतके जुळतात हे चमत्कारिक
"शिंदे गटाने मागावं, विचारावं ते आधीच ठरलेलं आहे की काय अशी शंका मनात येते. ते जे म्हणतील तेच होतंय. त्यांचं आणि या संस्थांच्या विचारांचं गणित एवढं जुळतंय की हा सुद्धा एक चमत्कारिक प्रश्न प्रत्येकाचा मनात निर्माण होतो," असं अनिल देसाई म्हणाले. तसंच शेवटी ओरिजनल हे ओरिजनल असंत. या सगळ्या गोष्टींना जनता न्याय देईल, असंही त्यांनी म्हटलंय

Anil Desai on Eknath Shinde Group : शिंदे गटाला जे हवं ते कसं मिळतं? अनिल देसाईंचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Operation Tiger 3: 'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget