Vadgaon Sheri Assembly Election 2024 पुणे : राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा 5 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला.  वडगाव शेरी मतदार संघात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांनी अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. मात्रा आता वडगाव शेरीचे विद्यमान आमदार बापू पठारे वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे.


बापू पठारे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात ही भेट असल्याची आणि त्या अनुषंगाने चर्चा केल्याची पठारे यांनी माहिती दिली आहे. तर भेटीत कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचा पठारेंनी दावा केला आहे. पुण्यातून शरद पवारांचे एकमेव आमदार बापू पठारे आहेत. मात्र या भेटीत नेमकं काही खालबत झाले असल्याच्या उलट सुलट चर्चा आता रंगू लागल्या आहेत.


पुण्यातून शरद पवारांचे एकमेव आमदार बापू पठारे 


विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. महायुतीकडून ही जागा भाजपच्या जगदीश मुळीक यांना जाणार की विद्यमान आमदार सुनील टिंगरे हेच वडगाव शेरीचे आगामी उमेदवार असणार यावरून जोरदार चर्चा रंगली होती. अखेरीस सुनील टिंगरे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनुभवी उमेदवार असलेल्या बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली. आणि तेव्हापासून वडगाव शेरीचा सामना अटीतटीचा होईल अशी शक्यता वर्तवली गेली. आणि प्रत्यक्षात झाले ही तसेच. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात बापू पठारे यांनी आघाडी मोडून काढत तब्बल 5 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला.


मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याचं कारण काय? सुनील शेळकेंनी स्पष्ट सांगितलं!


संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नाव असणाऱ्या सुनील शेळकेंचा ऐनवेळी पत्ता कट झाला. मंत्रीपद देताना नेमकं कोणतं निकष लावण्यात आलं आणि त्या निकषात शेळके बसत नव्हते का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. याचा खुलासा थेट शेळकेंनी बोलून दाखवलं. पुणे जिल्ह्यात दोनच मंत्रीपद दिली जाणार होती. याची कल्पना मंत्रीपद विस्ताराच्या तीन दिवस आधीचं मला अजित दादांनी दिली होती. असा दावा शेळकेंनी केला. मात्र मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळं मी नाराज नाही. असं ही शेळके म्हणाले.


हे ही वाचा