laxman Hake On Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujal) यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर ते दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. 


मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना डावलल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (laxman Hake) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार ओबीसी विरोधी भूमिका घेतं असतील तर आम्हाला विचार करावा लागेल. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होतं आहे. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर ओबीसींचा आवाज आहे. महायुतीने दोघांनाही डावलून काय संदेश दिला जातोय?, असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. 


वाल्मिक कराड यांचे शरद पवारांच्यासोबतही फोटो-


संतोष देशमुख यांच्या घटनेला जातीय विद्वेष देऊ नका. वाल्मिक कराड यांचे शरद पवारांच्यासोबत फोटो आहेत. जयंत पाटील काय त्यांच्याबद्दल भाषण करतात. जर वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत  फोटोमध्ये दिसतात इतर नेत्यासोबत दिसत नाहीत का?, असं लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरही लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे यांना शुभेच्छा आहे. कायदेशीर मार्गाने त्यांनी आंदोलन करावे. ओबीसीमधून त्यांनी आरक्षण मागू नये. बंठीया समितीचा अहवाल फेटाळून लावावा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. 


काका-पुतणे गप्प का?- लक्ष्मण हाके


शरद पवार आणि अजित पवार यांनी मुळशीमध्ये घडलेल्या घटनेबाबतही जाऊन भेटायला हवं, बिल्डर धमकावले जातात, रांजणगाव एमआयडीसीमध्ये काय सुरू आहे. मुळशी पॅटर्न चित्रपट येतो. पुणे जिल्ह्यात काय सुरू आहे, काका-पुतणे यावर गप्प आहेत?, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.


तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करावा...राष्ट्रवादीच्या नादी लागू नका...- राजेंद्र महाडोळे


साहेबांना मंत्रिपद मिळाले पाहिजे या मताशी मी सहमत नाही.ओबीसीच्या अधिकाराचा प्रश्न, त्यांना मंत्रिमंडळ बाहेर ठेव्याचे म्हणजे ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न आहे. ही आमच्या अधिकारची लढाई आहे, साहेबांची नाही. तुम्ही आम्ही पेटून उठले पाहिजे...ओबीसींच्या जीवाशी तुम्ही खेळत असला तर ती चूक आहे, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करावा...राष्ट्रवादीच्या नादी लागू नका...तुम्ही ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहेत. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही मागे येणार..., असं ओबीसी मोर्चाचे महासचिव राजेंद्र महाडोळे म्हणाले.


संबंधित बातमी:


Maharashtra Guardian Ministers List: तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?; रायगडमध्ये शिवसेनेचा दावा, अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष