पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती, पुरंदर, इंदापूर आणि भोरमध्ये विविध गावांना भेटी दिल्या. पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधील अडचणी समजून घेतल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. बऱ्याच गोष्टी लोकांनी सांगितल्या आहेत त्या बद्दल मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे.दुष्काळी भागाबाबत अनेक प्रश्न आहे. योजना झाल्या त्या माझ्या सहीने झाल्या होत्या.त्या बाबत काही धोरणात्मक आहेत..त्यांनी बैठक व्हावी अशी विनंती केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. त्यातून काहीतरी अनकुल व्हावे असे मला वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. 


पाण्याचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे तसाच शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा महत्त्वाचा आहे.  दुधाचा खर्च आणि त्याची मिळणारी किंमत याचा मेळ बसत नाही, असं सांगण्यात आलं आहे. दुधाचा दर 5  रुपये वाढवला जावा, असं शरद पवार म्हणाले. सरकारनं अनुदान जाहीर केलं पण ते त्यांना मिळालं नाही, असं शरद पवार म्हणाले. अनेक ठिकाणच्या लोकांच्या विनंती रयत शिक्षण संस्था आणि इतर संस्थांबाबत होत्या, असं शरद पवार यांनी म्हटलं. यावेळी शरद पवारांनी राज्याच्या इतर भागात कधी दौरे करणार याबाबत देखील माहिती दिली.


लोकांसोबत सुसंवाद साधणार : शरद पवार


आजचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या अधिकाऱ्यांची आणि परवा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार आहे. संसदेचं सत्र आता सुरु होईल. ते संपलं की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढतील,  तिथं जाऊन तिथल्या सहकाऱ्यांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न राहील, असं शरद पवार म्हणाले. 


संसदेचं सत्र  सुरु होईल तेव्हा विरोधीपक्षनेते पदाबाबत चर्चा होईल. आता जास्त जागा काँग्रेसच्या आलेल्या आहेत. काँग्रेस विरोधी पक्षनेता कोण असेल हे ठरवेल. त्याला आमची सहमती घ्यावी लागेल, असं शरद पवार म्हणाले. लोकसभेचं उपसभापतीपद विरोधी पक्षांना मिळेल असं वाटत नाही, असंही शरद पवार म्हणाले. 


महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या विश्वासाला तडा गेलेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास नाही असं दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले. छगन भुजबळ यांच्या बद्दल काही माहिती नाही. आरक्षण आंदोलनातून सामाजिक तणाव वाढणार नाही, याची खात्री केंद्र आणि  राज्य सरकारनं घेतली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. 


संबंधित बातम्या :


विधानपरिषदेसाठी निष्ठवंतांना संधी द्या, भाजप पदाधिकाऱ्याचं थेट खासदार अशोक चव्हाणांना पत्र 


Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका, लोकसभेच्या सरचिटणीसांकडे नोटीस