मुंबई : पंढरपूरची आषाढी वारी सुरु झाली आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं विविध ठिकाणाहून निघणाऱ्या दिंड्या आणि पालखी सोहळे मार्गक्रमण करत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देखील आषाढी वारीत सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. राहुल गांधी यांना आषाढी वारीचं (Ashadhi Wari) निमंत्रण कुणी दिलं? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेटसअप मराठी यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली यामध्ये सर्वकाही सांगितलं. राहुल गांधी आषाढी एकादशीपूर्वी वारीत चालतील आणि पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेतील, अशी शक्यता आहे.


शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आषाढी वारीच्या सहभागाचं निमंत्रण कुणी दिलं हे स्पष्टपणे सांगितलं. राहुल गांधी यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा महाराष्ट्रातले खासदार तिथं आले. आमच्या पक्षाचे काही खासदार आणि सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे आणि आमचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तिथं आले.हे सगळे तिथं आले, काय काम आहे विचारलं तर म्हणले की राहुल गांधी यांना वारीचं निमंत्रण द्यायचं आहे. खासदारांनी निमंत्रण दिलं, मी तिथं हजर होतो. राहुल गांधींना तुम्ही या म्हटलं, असं शरद पवार यांनी सांगितलं.


शरद पवारांनी सांगितलं की, मी म्हटलं तुम्ही या काही हरकत नाही.तुम्ही एवढी मोठी यात्रा काढलीत, तुम्हाला यातून आनंद मिळेल. यात लाखो लोक असतात, चालत असतात कशाचीही अपेक्षा नसते. निमंत्रण त्या सगळ्यांनी दिलं, मी त्यात भर घातली. राहुल गांधी यांनी वारी म्हणजे काय विचारलं तेवढं सांगितलं, असं शरद पवार यांनी म्हटलं.


मी कधी फार चालत गेलोय असं नाही. माझ्या गावापासून पालखी सोहळा गावापासून जात असताना तिथं थांबलो होतो, असं शरद पवार यांनी म्हटलं. 


शरद पवार यांचं एक दिवस तरी वारी अनुभवावी उपक्रमात मार्गदर्शन


दरम्यान, शरद पवार यांनी आज एक दिवस तरी वारी अनुभवावी या उपक्रमात सहभाग नोंदवला.  शेकडो वर्षांपूर्वीपासून माणुसकीचा संदेश वारीच्या प्रवासाच्या माध्यमातून अखंडपणाने केला जातो. कोण कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या वंशाचा याचा विचार इथे कधीही नसतो. आनंद हा आहे की अलीकडच्या काळामध्ये समाजातील सुशिक्षित लोक, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक हे सुद्धा वारीमध्ये सहभागी व्हायला लागले. संतश्रेष्ठांचा हा विचार खाली पोहोचवण्याच्या दृष्टीने काही ना काहीतरी हातभार लावण्याचं काम आजच्या काळामध्ये ते करत आहेत. हा विचार महाराष्ट्र पुरता सीमित नाही, तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे, असं शरद पवार म्हणाले.


संबंधित बातम्या :


Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?


Sharad Pawar : अजितची कष्ट करण्याची तयारी, मोठं मन दाखवून पवारांनी सांगितली अजितदादांची वैशिष्टे, पण 'हे' खटकतं