Sharad Pawar Press Conference, Pune : "विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांचे काम करण्यासाठी सहभागी होत आहेत. देशमुखांनी आज निर्णय घेतला. लोकांचे काम करण्याची भूमिका त्यांनी खेड तालुक्यात बजावली. परंतु, लोकांच्या समस्यात आणि भाजपच्या धोरणात फरक आहे. त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. येत्या 16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील", असे राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. पुण्यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हेही उपस्थित होते. 


कशाचीही अपेक्षा न करता पक्षात येतात


उमेदवारीच्या संदर्भात चर्चा केलेली नाही. कशाचेही अपेक्षा न करता काही लोक पक्षात येतात. ज्यांनी प्रवेश केला त्यांनी कशाचीही अपेक्षा ठेवलेली नाही. अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहा. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तीमत्वावर टीका केली जात आहे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे. 


स्वाभिमानाने राहायचे असेल तर एकच नाव समोर आले ते म्हणजे पवार


गेल्या 10 वर्षात भाजपचे काम करत असताना पक्ष वाढवण्याचे काम केले. मात्र, गेल्या काही वर्षात स्वाभिमानाला धक्का बसला. सर्व सामान्यांचे काम होत नसतील आणि स्वाभिमानाने राहायचे असेल तर एकच नाव समोर आले ते म्हणजे पवार साहेबांचे होते. त्यामुळे आज आम्ही शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


'वेट अँड वॉच'! पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांचं स्पष्टीकरण, पाच वर्षांनंतर माढ्याचं राजकीय वर्तुळ होणार पूर्ण