नागपूर: गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीने अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मते घेतली होती. या मतविभागणीमुळे राज्यातील अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते वंचित (VBA) फॅक्टरविषयी सावध आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा तितकासा प्रभाव जाणवणार नाही, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तविले आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी म्हटले की, गेल्यावेळेला वंचित आघाडीबरोबर अल्पसंख्याक समाज आणि त्यांचे नेते होते. आता त्यांच्यासोबत अल्पसंख्याक नेते नाहीत. त्यामुळे वंचितबाबत यंदा गेल्यावेळसारखा निकाल येईल, असे वाटत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, अल्पसंख्याक समाज कोणाला विजयी करायचे आहे, यापेक्षा कोणाला पराभूत करायचे आहे, याचा जास्त विचार करतो. यंदा मात्र वेगळा मूड आहे. भाजपला पराभूत करु शकणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याचा लोकांचा मूड आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. यावर आता प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. 


औरंगाबादचा जलील पॅटर्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होणार? प्रकाश आंबेडकर माझा कट्टावर काय म्हणाले?


आढळराव पाटलांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर


शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्याविषयी अलीकडेच एक वक्तव्य केले होते. आता शरद पवार यांच्या नावाने मतं मागण्याचे दिवस गेले, असे आढळरावांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार यांनी म्हटले की, जेव्हा मतदान होईल आणि निकाल येईल तेव्हा अमोल कोल्हे विजयी झालेले असतील. तेव्हा सगळं काही स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.  सातारची जागा आम्ही 100 टक्के जिंकू. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन चांगले उमेदवार असल्याचा दावाही शरद पवार यांनी केला.


आणखी वाचा


शरद पवार संपले म्हणणारे विरोधी पक्षात बसले, आता ते 'डेप्युटी' आहेत; पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला