Sharad Pawar on Uddhav Thackeray : गेल्या काही वर्षा भारतीय जनता पक्षाकडून विरोधी पक्षांना तुमच्या पंतप्रधानपदाचा चेहरा कोण ? अशी विचारणा करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ठाकरे यांनी मी देखील पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतो, असा दावा केला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात का? या प्रश्नावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार पंतप्रधानपदाचा चेहरो कोण असेल? याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मी देखील पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतो, असा दावा केला होता. यावर तुम्हाला काय वाटतं? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कोणीही असू शकतं. लोकशाहीमध्ये लोक म्हणत असतील तर निश्चितपणाने असं होऊ शकतं. चेहरा नाही म्हणजे काय? देशात अनेक अशा निवडणूक झाल्या आहेत. उदाहरण सांगायचे झाले तर 1977 साली निवडणूकीला लोक जयप्रकाश नारायण यांच्या बाजूने...निवडणूक झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली. त्या निवडणुकीत कोणाचा चेहरा समोर नव्हता. निवडणूक झाल्यानंतर खासदारांची संख्या चांगली आली. त्यानंतर बैठक बोलावण्यात आली आणि त्यातून मोरारजी देसाई यांची निवड झाली. निवडणूकीत मोरारजी भाईंना प्रोजेक्ट केलेलं नव्हतं. त्यानंतर सरकार सुद्धा बनलं. त्यामुळे चेहरा नाही म्हणणे हे शहानपणाचे नाही. या निवडणूकीत मोदींचा चेहरा लोकांना पसंत आहे की नाही? हे निवडणूक झाल्यानंतर समजेल.
मूळ प्रश्नाला बगल देऊन, मोदी व्यक्तीगत हल्ले करत आहेत
मोदींना आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यांचा विश्वास ढळलेला नाही. शेवटी सभा किती घ्यायच्या हा त्या पक्षातील नेतृत्वाचा अधिकार आहे. पण सभा घेऊन सांगत काय आहेत? तर व्यक्तीगत हल्ले करत आहेत. देशात महागाईचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यावर उपाय काय हे सांगण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण मोदींनी या निवडणुकीत लोकांची निराशा केली आहे. मूळ प्रश्नाला बगल देऊन मला भटकती आत्मा म्हणाले. राहुल गांधींना शहेजादा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या संघटनेसंबंधी काहीही बोलू लागले, असं शरद पवारांनी नमूदं केलं.
इतर महत्वाच्या बातम्या