Sharad Pawar on Sangli Loksabha : सांगली लोकसभेवरुन (Sangli Loksabha) महाविकास आघाडीतील वाद थांबता थांबत नाहीये. सांगलीतील मविआच्या उमेदवाराचा घोळ शेवटपर्यंत संपलेला नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मविआचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी (Vishal Patil) बंडखोरी केली आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगलीच्या वादावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाले शरद पवार ? 


चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच कळाली. याबाबत चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेने सांगलीच्या उमेदवारी बाबत गडबड केली की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सांगलीचे उमेदवारीवरून आधीच बराच काथ्याकूट झाला असताना आता तर शरद पवारांनी सांगलीचे उमेदवारी आम्हाला देखील टीव्हीवरुन  समजली. आमच्यात उमेदवारी चर्चा झाली नव्हती, असं सांगितल्याने सांगलीची उमेदवारीच्या जाहीर होण्याबाबतचा गुंता अधिकच वाढलायय


विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार? 


शरद पवार यांच्या सांगलीबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पवारांच्या वक्तव्यावर सहम्मत असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेने सांगलीची उमेदवारी परस्पर का जाहीर केली? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, विशाल पाटलांवर काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे. हायकमांडला याबाबतची संपूर्ण माहिती दिली असल्याचेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. 


शरद पवारांचा ठाकरेंना धक्का 


सांगलीतून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. मात्र,  काँग्रेसकडून मनापासून प्रतिसाद प्रचारात मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच शरद पवारांनी हे वक्तव्य करून ठाकरेंना एक प्रकारे धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे. शिवाय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनेही बंडखोर विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 


संजयकाका पाटलांसाठी योगी आदित्यनाथ यांची सभा


भाजपकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर महायुतीने संजयकाकांसाठी प्रचाराचा धडाकाच सुरु केलाय. सांगलीत विजय मिळवण्यासाठी भाजपकडून योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. योगी आदित्य नाथ यांनी सांगलीत बत्तीस शिराळ्यासह विविध विषयांवर भाष्य केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rohit Pawar on Ajit Pawar : तिकडे मलिदा गँग, इकडे जनता अशी निवडणूक आहे, रोहित पवारांचा अजितदादांवर हल्लाबोल