Sharad Pawar on Rajesh Tope, Chhatrapati Sambhajinagar : "इथं कोणी उभा राहावं अशी चर्चा झाली. त्यात राजेश टोपे यांचं नाव आलं. यावेळी त्यांनी चातुर्य दाखवलं त्यांनी उमेदवारीची माळ काळे यांच्या गळ्यात टाकली. यावेळी सुटलात पुढच्या वेळी पाहतो", असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढील लोकसभेत आमदार राजेश टोपेंना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांचा सपत्निक सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके, बाळासाहेब थोरात, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित आहेत.
पंतप्रधानांच्या मनात आकस आहे, त्यांना जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी आकस आहे
शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांच्या मनात एक आकस आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी आकस आहे. त्यांनी यांच्या विषयात चुकीचे वक्तव्य केले. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी आकस करणं म्हणजे नेतृत्व किती कोत्या वृत्तीचे आहे हे समोर येत. आजपासून 70 दिवसात आचार संहिता येणार आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र येवून महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचं काम करायचे आहे. आघाडीचा सदस्य म्हणून खात्रीने सांगतो. महाराष्ट्रचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करू, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.
जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो
कल्याण काळे म्हणाले, जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो. देशाचे संविधान वाचवण्याचे काम शरद पवार यांनी केले. निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवटी रामकृष्ण हरी म्हणाले. बरे झाले वाजवा तुतारी म्हणाले नाही. दुधाच्या दरा संदर्भात शरद पवार यांनी बाजू घ्यावी. मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केले आहे, त्या बाबत भूमिका शरद पवार यांनी घेतली पाहिजे, असंही कल्याण काळे म्हणाले.
निलेश लंके म्हणाले, मी लुकडा सुकडा पैलवान, कल्याण काळेंनी उमेदवारी घेतली नसती तर ती माळ माझ्या गळ्यात पडली असती. खासदार कल्याण काळे हे जायंट किलर आहेत. लोकसभा झाली आता राज्य ताब्यात पाहिजे. विधानसभेला अशी तयारी करायची की, समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे