Sharad Pawar on Dattatray Bharne, Indapur : "आपल्या तालुक्यामध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळी स्थिती आहे. आज या ठिकाणी माझी खात्री आहे. तुमच्या सर्वांच्या सामुदायिक शक्तीने इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल, यामध्ये तिळमात्र, शंका नाही. एक आहेत, त्यांना मी आमदार सुद्धा केलं. त्यांना मंत्री केलं. काही लोक माझ्याकडे आले होते.  ते इंदापुरात द्राक्षाची शेती करतात. त्या लोकांनी सांगितलं. आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य द्यायचं आहे. पण आम्हाला हे सांगण्यात आलं की, तुम्ही जर त्यांना सहकार्य केल तर तुमच्या शेतीचं पाणी बंद करु. गमतीची गोष्ट आहे. शेतीचं पाणी बापजाद्याची इस्टेट नाही. मी त्यांना एवढचं सांगू शकतो की, अरे मामा जपून , तुझं सगळं काढायला वेळ लागणार नाही", असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्यावर हल्लाबोल केला.  बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात महाविकास आघाडीची प्रचार सांगता सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते. 


त्यांचे पाय आज जमिनीवर राहिलेले नाहीत


शरद पवार म्हणाले, तुझ्यासाठी काय केलं नाही. गुजरातमधून औषध कंपनीच्या एजन्सी त्यांना हव्या होत्या. माझ्याकडे आले, मी संबंधीत लोकांशी बोललो. आम्ही असा विचार करतो, लहान कुटुंबातून लहान समाजातून काही लोक येत असतात. त्यांना उभं करण्यासाठी शक्ती आणि पाठिंबा देण्याची गरज असते. मी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पाय आज जमिनीवर राहिलेले नाहीत. ते आज हवेत आहेत. त्यांच डोकं हवेत आहेत, असंही शरद पवारांनी सांगितले. 


सबंध देशाचे राजकारण योग्य दिशेला आणता येईल


महाराष्ट्राच्या साधारणत: 40 सभेमध्ये मी भाषण करुन आलोय. त्यामुळे सहाजिक उन्हाळा सतत भाषण आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम कोठे ना कोठे होतो. आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण एकत्र आला आहोत. ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे देशाला नवीन दिशा दाखवण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने निवडणूक अतिशय महत्वाची आहे. देशामध्ये अनेक पक्ष  आहेत, त्यापैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे. संबंध देशाचा अधिकार दिल्यानंतर त्यांनी जे निर्णय घेतले, त्यामुळे समाज आज अस्वस्थ आहे. त्यामुळे सबंध देशाचे राजकारण योग्य दिशेला आणता येईल, याचा विचार आम्ही करतो आहोत. वेगवेगळ्या पक्षांना आम्ही एकत्र केलं आहे, असही पवार म्हणाले. 


दमदाटी करतात, पाणी देणार नाही म्हणतात


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आज केरळमध्ये भाजपच राज्य नाही, तामिळनाडूमध्ये भाजपचं राज्य नाही, दुसऱ्या पक्षाचं राज्य आहे. असे अनेक राज्ये आहेत, ज्याठिकाणी भाजपचे राज्य नाही. राज्य आहे कोठे? महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश अशा राज्यात त्यांचे राज्य आहे. इतर कोणत्याही राज्यात त्यांचे राज्य नाही, अशा पार्श्वभूमीवर निवडणूक होत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत. आपल्या भागामध्ये आहेत. त्या पक्षाचे वैशिष्ट आहे. दमदाटी करतात, पाणी देणार नाही म्हणतात. कुठे नोकरी टिकणार नाही म्हणतात. आज देशाचे राज्यकर्ते असे करत आहेत. या गोष्टीकडे बारकाईने पाहिले पाहिजे. मी महाराष्ट्रात फिरतोय मला एक गोष्ट जाणवली आहे. महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतला आहे, त्यांना बदल हवा आहे. भाजपला सत्तेतून उखाडून टाकून नव्या विचाराच्या लोकांना द्यायची आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Raosaheb Danve on Arjun Khotkar : मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून, रावसाहेब दानवे काय काय म्हणाले