Vaibhav Naik on Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 


रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत (Narayan Rane vs Vinayak Raut) यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. तर नारायण राणे यांच्यासाठी भाजपकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांनीही प्रचार सभा घेतली. 


राज ठाकरे ज्यांच्यासाठी प्रचाराला जातात त्यांचाच पराभव होतो


राज ठाकरे यांच्या प्रचार सभेवरून वैभव नाईक (Vaibhav Naik) म्हणाले की, राज ठाकरेंना कोकणाची माहिती नाहीय.  राज ठाकरे ज्यांच्यासाठी प्रचार करायला जातात त्यांचाच पराभव होतो.  हा आजपर्यंतचा इतिहास आहे. राज ठाकरे प्रचाराला गेले की, उमेदवार पडतो म्हणजे पडतो.  त्यामुळे राज ठाकरेंमुळे आम्हीच सिंधुदुर्ग - रत्नागिरीची जागा जिंकणार आहोत. राज ठाकरेंनी मागच्या वेळेस 'लाव रे व्हिडीओ' लावला होता. तेव्हादेखील आम्हीच जिंकलो होतो, अशी टीका त्यांनी केली आहे.


काय म्हणाले होते राज ठाकरे? 


उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते. कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.  2014 ते 2019 तुम्ही भाजप बरोबर सत्तेत होतात नंतर 2019 ते 2022 स्वतः मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत? उद्योगधंदा आला की उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणतं पक्षाचं धोरण ? अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 


आणखी वाचा 


Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या तोंडात सत्तेचा बोळा असता तर ते नारायणराव राणेंवर कौतुकाचा वर्षाव; राज ठाकरेंच्या सभेतील 10 मुद्दे