Sharad Pawar on Ajit Pawar, मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना महायुतीमध्ये घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका संघाचे मुख्यपत्र असलेल्य ऑर्गनायझर नियतकालिकातून करण्यात आली होती. त्यानंतर लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. मी विकासावर लक्ष केंद्रीत केलंय, असं अजित पवार यांनी म्हटलं. दरम्यान, आता शरद पवारांनी (Sharad Pawar) ब्रँड व्हॅल्यूच्या प्रश्नाबाबत उत्तर दिलं आहे. यशवंतराव सेंटर मुंबई येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. 



काय म्हणाले शरद पवार ? 


अजित पवार यांच्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका नुकतीच संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर नियतकालिकातून करण्यात आली होती. याबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हटले की, त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. पण त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की, महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहे, पण ती आता आम्ही बोलू इच्छित नाही, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. देशात होत असलेल्या सत्तेच्या गैरवापरासंबधी या निवडणुकीतून लोकांनी जी भूमिका घेतली, त्यामधून शहाणपणा शिकतील, अशी अपेक्षा होती. पण तो शहाणपणा सरकार शिकेल, असे दिसत नाही. त्यामुळे आणखी दोन-तीन महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी मिळेल, तेव्हा लोक पूर्ण विचार करुन ठोस निर्णय घेतील. कांदा उत्पादन करणारा शेतकरी नाराज होता 
आजही काही बदल त्यात झाला असा वाटतं नाही. जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.


इंडिया आघाडीला मतं दिली तर तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील


उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडीला मतं दिली तर तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील. तुमचे मंगळसूत्र काढून घेतली.  तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापतील हे काय खरं नेरेटीव्ह होतं का, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. गेल्या काही दिवसांपासून एनडीएकडून संविधान बदलणार हे खोटे नॅरेटिव्ह इंडिया आघाडीकडून चालवण्यात आले, असा आरोप करण्यात येत होता. त्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल; शरद पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला