पुणे: राज्याच्या राजकारणात वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे नितेश राणे (Nitesh Rane) पुन्हा एकदा अशात एका आक्रमक वक्तव्य वक्तव्यांनी चर्चेत आले आहेत. 'ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) सत्ता आहे, किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असं वक्तव्य मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे. इतकेच नाही तर निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा, असंही राणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटताना दिसून येत आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 
 
नितेश राणे यांनी निधी वाटपावरून केलेल्या विधानानंतर राणेंच्या विरोधात पुण्यातील कोथरूड परिसरात त्यांना उत्तर देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. "सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब" असं लिहून निधी वाटपावरून राणे यांच्या विधानावरून टीका करण्यात आली आहे. "मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा?"  असा सवाल देखील बॅनर मधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यात राणेंच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 


बॅनरवरती काय लिहलंय?


"सत्तेचा माज बरा नव्हे  मंत्री साहेब" असं लिहून निधी वाटपावरून राणे यांच्या विधानावरून टीका करण्यात आली आहे. "मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा?"  असा सवाल देखील बॅनर मधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला आहे.


नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?


ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) सत्ता आहे किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही, निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा, असंही राणे यांनी म्हटलं होतं. तर पुढील वर्षी महायुतीच्या उमेदवारालाच निधी मिळणार आहे. येणाऱ्या निवडणुका शतप्रतिशत भाजप म्हणून लढविणार आहोत. 10 वर्षात विरोधात असताना खूप मला त्रास झाला आता मी सत्तेत आहे. आपल्या भाजपची ताकद वाढायला हवी.  मुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद वाढवा, त्यांचे हात बळकट करा, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कोणीही चुकून विरोधकांना मदत करू नका.  या जिल्ह्यात महायुतीच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 


राणेंच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले 


शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड संतापल्याचे दिसून आले. नितेश राणे त्यांच्या घरातून पैसे देणार आहेत का? असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. अजित पवारांनी माझ्या विरोधात उभं असलेल्या उमेदवाराला भरभरुन निधी दिला तरिही त्यांचा उमेदवार एक लाख मतांनी पडला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.


ऑपरेशन ब्लॅकमेलर राबवणाऱ्या पक्षाने हा व्हिडिओ ...


विश्वगुरू होण्याची भाषा करणारे पंतप्रधान आणि ऑपरेशन ब्लॅकमेलर राबवणाऱ्या पक्षाने हा व्हिडिओ बघितल्यानंतरही या देशात लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे यावर भाषणे द्यायला हवेत काय ? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.