एक्स्प्लोर

Sharad Pawar: माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

Maharashtra Politics: आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर शरद पवारांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरली होती.

सातारा: बारामती लोकसभा मतदारसंघात मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या वादाबाबत शरद पवार यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन एकप्रकारे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या पवार घराण्याबाहेरुन आल्याचे सूचित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावरुन अजित पवार (Ajit Pawar) गटाने आक्रमक होत सून हीदेखील त्या घराण्याचाच भाग असते, असा प्रचार सुरु केला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. 

शरद पवार यांनी म्हटले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला जो प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर मी बोललो. अजित पवार यांनी काय भाष्य केले होते, तुम्ही शरद पवारांना निवडून दिलंत, मला निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. त्यांच्या या वक्तव्यावर मी भाष्य केले होते. माझं म्हणणं फक्त अजित पवारांच्या त्या वक्तव्याबाबत मर्यादित होते. यापेक्षा मला काहीही वेगळे सांगायचे नव्हते, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवारांच्या लेखी सून ही घराण्याचा भाग नसते, असा प्रचार अजित पवार गटाकडून केला जात आहे. त्यावर शरद पवार यांनी राजकीय कारकीर्दीत महिला हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचला. राज्यात महिला आरक्षणाचा निर्णय घेणारा पहिला मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेत महिलांना विशिष्ट आरक्षण देण्याचा मी घेतला. केंद्रात मी संरक्षणमंत्री असताना मुलींना सैन्यदलात घेण्याचा निर्णयही मी घेतला. त्यामुळे आमच्या लोकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे स्पष्ट होते, असे शरद पवार यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत जाणवेल का? शरद पवार म्हणाले...

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का, याबाबत ठोसपणे बोलण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले की, मी मराठवाड्यात गेलो होतो, तेथील लोकांच्या मनात राग आहे. या लोकांना मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आस्था आहे. पण या आस्थेचे मतांमध्ये किती रुपांतर होईल, हे माहिती नाही. मी जरांगे-पाटील यांना फार ओळखत नाही. मी त्यांना उपोषणाच्या सुरुवातीला त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी एकदाच भेटलो होतो, असे शरद पवार यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul President Election 2026: गोकुळ दूध संघावर सत्ता स्थापनेच्या दिशेने महायुतीचे पहिलं पाऊल?; वटहुकूम काढला जाण्याची शक्यता, नेमकं काय काय घडतंय?
गोकुळ दूध संघावर सत्ता स्थापनेच्या दिशेने महायुतीचे पहिलं पाऊल?; वटहुकूम काढला जाण्याची शक्यता, नेमकं काय काय घडतंय?
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
NCP Core Committee Meeting : पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत तीव्र नाराजी, निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप, सूत्रांची माहिती
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत तीव्र नाराजी, निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप, सूत्रांची माहिती
पक्षात कुठेही नाराजी नाही, दिल्लीतील बैठक नियोजित, सुनिल तटकरेंनी दिली महत्वाची माहिती, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
पक्षात कुठेही नाराजी नाही, दिल्लीतील बैठक नियोजित, सुनिल तटकरेंनी दिली महत्वाची माहिती, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
Mumbai Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
Embed widget