Sharad Pawar Birthday, दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. दरम्यान, दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल अशी सर्व मंडळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी पवारांनी तलवारी केक कापला. दरम्यान, पवारांनी तलवारीने केक कापल्यानंतर महंत सुधीरदास पुजारी (Mahant Sudhir Das) यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत..
महंत सुधीरदास यांचा शरद पवारांना खोचक टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच महंत सुधीरदास पुजारी यांनी लगावला खोचक टोला लगावलाय. सर्वसामान्यांनी तलवारीने केक कापल्याने पोलीस कारवाई करतात. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी तलवारीने केक कापल्यामुळे महाराष्ट्रात काय पण दिल्लीतही त्यांना कायदा लागू आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मात्र तलवारीने केक कापू नये असे वाटते, असं महंत सुधीर दास म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात आणि देशात शरद पवारांसाठी कायदे लागू आहेत की नाहीत?
महंत सुधीर दास म्हणाले, शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी तलवारीने केक कापल्याचं फुटेज पाहण्यात आलं. सर्व सामान्य व्यक्तींनी तलवारीने केक कापला तर पोलीस गुन्हे दाखल करतात. परंतु शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना कायदे आणि कानून महाराष्ट्रात आणि देशात लागू आहेत की नाहीत? हाच मोठा प्रश्न आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परंतु त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तलवारीने केक कापणे योग्य नाही.
मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही, बारामतीत बॅनरबाजी
शरद पवारांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने बारामतीमध्ये शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव करणारे बॅनर्स लागलेले आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावलेले आहेत. परंतु अनेक बॅनरचे अजित पवारांना खोचक टोला लगावणारे आहेत. बारामतीतील पंचायत समिती चौकात मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही अशा आशयाचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. तर नगर परिषदेत समोर देखील अजित पवारांना टोला लगावणारा बॅनर्स लगावला आहे लावला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या