Akola News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्ता सचिन गालट (Sachin Galat) यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज अकोल्यात (Akola) शिवसेनेचे उपनेते आणि संपर्कप्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यानंतर सचिन गालट यांची शिंदेंच्या शिवसेनेच्या बार्शी टाकळी तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


अमोल मिटकरींच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी मनसेच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल 


मनसे कार्यकर्त्यांनी 30 जुलै 2024 रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती. गाडीच्या तोडफोड प्रकरणी मनसेच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. जय मालोकारच्या कुटुंबीयांना मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी भेट दिली होती. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन गालट आणि अमोल मिटकरींचे मनोमिलन होणार का?,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.


नेमकं प्रकरण काय?


अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला  अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांचा ‘सुपारीबहाद्दर’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची 30 जुलैला अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर तोडफोड करण्यात आली होती. यावेळी मोठा वाद झाला होता. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेच्या 25 पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी व गुन्हा दाखल झालेले मनसैनिक जय मालोकार यांचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला होता. दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते. या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी कुटुंबीयांकडून सातत्याने करण्यात आली होती. दरम्यान, याच तोडफोडीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले मनसेचे कार्यकर्ते सचिन गालट (Sachin Galat)  यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेशळ केला आहे.




 



महत्वाच्या बातम्या:


Raj Thackeray : राज ठाकरेंना पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी किती आमदारांची गरज आणि किती मते मिळवावीच लागणार?