Shahajibapu Patil, Sangola : सांगोला विधानसभा (Sangola Vidhansabha) मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये.  शहाजीबापूंनी  आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला असून दीपक साळुंखे आणि माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्यावरती निशाणा साधलाय.


यावेळेस बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, दीपक आबामुळं मी निवडून आलो असे सगळीकडे सांगत सुटले आहेत.  मात्र त्यांची मला मदत झाली हे खरे आहे, पण मी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये निवडून येतोय.  1995 साली दीपक साळुंखे आमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीमध्ये बसत होते. त्यांची गाडी देखील मी पालथी पाडून मी मुंबई ला गेलो होतो, असं म्हणत शहाजीबापूंनी दीपक साळुकेंवर टीका केलीये. 


मी दीपक आबांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. त्यांना काहीतरी कराव लागतंय असं म्हणून रात्री दोन वाजेपर्यंत थांबलो होतो. फोन करतोय दीपक आबांना मात्र ते दौरा आहे म्हणून सांगत आहेत.  विधानसभेचे आमदार असताना कुठे गेले होते दौरे? असा सवालही शहाजीबापूंना दीपक साळुकेंना केला. 


टोपी घालून शेतकऱ्यांचे कपडे घालून दीपक आबा मतदारसंघ फिरत आहेत. दीपक आबा आमदारांचं पोरगं मखमली गादीवरती तुम्ही लोळला. हे अख्ख्या सांगोल्याला माहित आहे, असं म्हणत शहाजीबापूंनी दीपक आबांची खिल्ली उडवली. याच्या अंगावरचा 50000 चा टी-शर्ट तालुक्याने बघितला आहे. याच्या घरात असणारे 200 बुटाचे जोड दीडशे कोल्हापुरी चप्पल हेही तालुक्याला माहिती आहे. हा कसला आलाय शेतकरी , याला कधी ज्वारी लावायची माहित आहे का? असा टोलाही शहाजीबापूंनी लगावलाय. 


मी आजवर इतक्या निवडणुका लढलोय आणि ही दोन पोरं पहिली निवडणूक लढतेत आणि मला पाडायचं भाकीत करत आहेत. अरे मी निवडणुकीचा महाराष्ट्र केसरी आहे आणि तुम्ही आत्ता लंगोट बांधायला शिकायला लागलाय, असा टोला शहाजीबापूंनी विरोधात असणाऱ्या दोन्ही उमेदवारांवर लगावला. तुम्ही रिंगणात उतरता आहे. मात्र तुमचे थरथरणारे पाय जनता बघतीये. निवडणुकीत विजय माझाच होणार आहे. अजूनही ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे यांनी विचार करावा.  माझ्यासोबत यावे असे आवाहनही शहाजीबापूंनी केले. 


याला काहीतरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे रात्री दोन दोन वाजेपर्यंत मी शिफारस करत होतो आणि याला बोलवले तर मी कधी कलकत्त्याला आहे, तर कधी हैदराबादला तर कधी बेंगलोरला अशा पद्धतीची उत्तर हा देत होता. पुन्हा फोन केल्यावर मी गाव भेट दौऱ्यात आहे ,असं सांगत होता. मात्र सहा वर्षे आमदार असताना ही कुठे गाव भेटीला गेलेला आठवतंय का? माझी तोफ पाच तारखेनंतर धडाडायला सुरुवात होणार असून एकदा उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपू दे रिंगणात कोण आहे ते पाहू दे मग माझ्या धडाका सुरू होईल, असा इशाराही बापूंनी दोन्ही विरोधी उमेदवारांना दिला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर