मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (baba siddique) यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये, गुलमेर सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणखर, हरिशकुमार निषाद, नितीन सापरे, राम कनोजिया, संभाजी पारधी, प्रदीप ठोंबरे, चेतन पारधी, भगवंत सिंह आणि अमित कुमार यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, फरार असलेल्या झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांकडून (Police) सर्वच आरोपींची कसून चौकशी केली जात असून अनेक नवनवीन माहिती व खुलासे पोलीस तपासातून समोर येत आहेत. आता, बाबा सिद्दीकी प्रकरणातून पोलीस तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंदुक व शस्त्रांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामध्ये, वापरण्यात आलेलं फॉरेन मेड पिस्तुल हे पाकिस्तानी ड्रोनने पाठवंल होतं का, याचा तपास पोलीस करत आहेत. कारण, तपासून तशा पद्धतीची माहिती समोर येत आहे. 


बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना आतापर्यंत फक्त तीन शस्त्रांची माहिती होती. मात्र, आरोपींकडे तीन नव्हे तर चार शस्त्रे असल्याचे आता तपासादरम्यान समोर आले आहे. आरोपींनी वापरलेलं 4 थे पिस्तूल हे ऑस्ट्रेलिया निर्मित ब्रेटा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. या बंदुकांची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पिस्तुलांची छायाचित्रे राजस्थान पोलिसांना पाठवली आहेत. अशा प्रकारची विदेशी पिस्तूल पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे भारतात पाठवली जातात, असा दावा राजस्थानी पोलिसांनी केला आहे. दरम्यान, पोलीस सध्या अशा प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत.


झिशान सिद्दीकींनी भरला उमेदवारी अर्ज


बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्वची जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.  आता झिशान विरुद्ध ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे. पक्ष प्रवेशावेळी झिशान थोडसे भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच बाबा बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती 


आत्तापर्यंत 15 जणांना अटक, कसून चौकशी


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर, लगेचच आणखी 4 जणांना अटक करण्यात आल्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक झाली आहे. पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी झीशान अख्तर हा जालंधरच्या तुरुंगातून 7 जून 2024 रोजी सुटला होता. त्यानंतर तो एका फरार आरोपीच्या मदतीनं अमित कुमारच्या संपर्कात आला होता. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची माहिती मिळाली होती, असं अमित कुमारनं चौकशीमध्ये मान्य केलं आहे. झीशान अख्तरनं अमित कुमारवर एक काम सोपवलं होतं. अमित कुमारच्या खात्यात एक व्यक्ती पैसे पाठवेल ती रक्कम काढून झीशान अख्तरला द्यायचे होते. एका त्रयस्थ व्यक्तीनं अमित कुमारच्या खात्यात दोन ते अडीच लाख रुपये पाठवले होते. ती रक्कम वेगवेगळ्या वेळी, 8 वेळा  अमित कुमारनं त्याच्या खात्यातून पैसे काढून झीशान अख्तरला दिले होते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट प्राथमिक पातळीवर होता, त्यावेळी अमित कुमारने त्याच्या खात्यातून पैसे काढून झीशान अख्तरला दिले होते.  


हेही वाचा


Raj Thackeray: रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला