Sanjay Raut : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ही घोषणा विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यातून आम्ही कसे तारक आहोत अशी दवंडी दिल्या गेली. पण महाराष्ट्रच सरकार ही आता फार वेगाने काम करत आहे असे दिसत नाही. ज्यांनी ही घोषणा दिल्लीतून केली, इथे पेढे वाटल्या गेले, पण अद्याप GR काही निघाला नाही. मग हा राजकीय जुमला होता का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काही भाषेंचा GR निघाला आहे. पण मराठी भाषेला देण्यात आलेल्या अभिजात भाषेचा GR अद्याप निघाला नाहीये. 


छत्तीसगडमधील बस्तरमध्ये शुक्रवारी (३ जानेवारी) सेप्टिक टँकमध्ये तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. याचबरोबर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत, ती जमिनदोस्त केली आहे. दरम्यान याच प्रकरणावर भाष्य करत संजय राऊतांनी टीका केली आहे.


ही कसली लोकशाही? - संजय राऊत


तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी रस्त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचार समोर आणला होता. असेच महाराष्ट्रात होत आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणही याच प्रकरणाशी साम्य आहे. सरपंच संतोष देशमुख यांनी भ्रष्टाचारच्या विरोधात आवाज केला आणि त्यातूनच त्यांची हत्या झाली. हे संपूर्ण देशात सुरू आहे. ही कसली लोकशाही? असा सवाल करत खासदार संजय राऊतांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावर भाष्य केले आहे. 


....तशीच हिटलरशाही इकडेही- संजय राऊत 


या देशात व्यंगचित्रकारला दर्जा आहे. शिवसेनेचा ही जन्म व्यंगचित्रकारमधून झाला आहे. हिटलरच्या विरुद्ध डेविड व्यंगचित्र काढत होता. त्याला जिंदा किंवा मुर्दा पकडायचा आदेशही त्यावेळी देण्यात आला होता. तशीच हिटलरशाही इकडेही आहे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.


कल्याणच्या घटनेवर फडणवीस, श्रीकांत शिंदे गप्प का? 


दरम्यान, कल्याण (Kalyan Crime) येथील अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यावरून संजय राऊत म्हणाले की, कल्याण, अंबरनाथ हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा जिल्हा आहे. ⁠या जिल्ह्यात लुटमार, बलात्काराचे प्रकार वाढले आहेत. गुंडांना अभय दिलं जातंय. आणि येथील ⁠खासदार मतदारसंघात फिरतही नाहीत. बलात्कार, खून करणारे हे बीड आणि कल्याणमध्येच का असतात? ⁠देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 


इतर महत्वाच्या बातम्या