Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले असताना या प्रकरणा बाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता कारवाईला वेग आला असून हे हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेनंतर आता या प्रकरणाच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिल म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत कोल्हे वकिल म्हणून काम पाहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.      


धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक


बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र काल झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.


अजित पवारांना पत्र देत केली मागणी 


तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून मागणी हकालपट्टी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज अजित पवारांना पत्र देण्यात येईल. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर बारामतीमध्ये काल (दि.21) शोक सभा तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करून उद्या अजित पवारांना धनंजय मुंडे यांना अटक करावी, अशा मागणीचे पत्र देण्यात येणार आहे. गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या