Maharashtra Legislative Assembly Winter Session 2024: विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2024) 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात झाले.  या अधिवेशनात नव्याने निवडून आलेले 78 सदस्य सहभागी झाले होते. नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला. पुढील अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी मुंबईत घेण्यात येईल, अशी घोषणा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधानसभेचे कामकाज 46 तास 26 मिनिटे तर, विधान परिषदेचे 36 तास काम झाले. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. तर विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण 17 विधेयके मंजूर झाली. तसेच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली.


देवेंद्र फडणवीसांनी कोणकोणत्या घोषणा केल्या? 


- विदर्भातील 110 सिंचन प्रकल्पांना मंजुरी, 61 कामे पूर्ण
- विदर्भात वैनगंगा-पैनगंगा- नळगंगा नदीजोड योजनेची निविदा जारी, 10 लाख हेक्टरचे सिंचन होणार, या योजनेत 550 किलोमीटरची नवीन नदी विकसित होणार
- अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार
- गोसी खुर्द सिंचन प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करणार, जल आणि वन पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय सुविधा तेथे उभारणार
- मराठवाडा वॉटर ग्रीड साकार होणार
- ग्रीनफिल्ड
- गडचिरोलीत विमानतळ साकारणार
- धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही 20 हजार रुपये बोनस मिळणार
- पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकारांची सखोल चौकशी
- मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू असून हा महामार्ग पूर्ण होईल


दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके-


(1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक, 2024 (ग्रामविकास विभाग) 
(2) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग) (अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पदावधी पाच वर्षे करणे) 
(3) श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) (सुधारणा) विधेयक, 2024 (विधि व न्याय विभाग) (विश्वस्त समितीचा कार्यकाळ आणि समिती सदस्यांची संख्या वाढविणे) 
(4) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2024 (सामान्य प्रशासन विभाग) (सर्वसाधारण बदलीसाठीच्या  कालावधी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्याची तरतूद) 
(5) महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2024 (महसूल व वन विभाग) (जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजनाचे नियमाधीकरण करण्यास परवानगी  देणे आणि नियमाधीकरण  अधिमुल्य  कमी करुन  बाजारमुल्याच्या 5 टक्के इतके निश्चित करणे) 
(6) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) 
(7) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (वाचन संस्कृतीचा व ग्रंथालय चळवळीचा विकास करण्यासाठी अधिनियमाच्या विवक्षीत कलमांमध्ये सुधारणा करणेबाबत)
(8) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (समुह विद्यापीठ घटित करणेच्या तरतुदीमध्ये सुधारणा) 
(9) महाराष्ट्र खाजगी विद्यापीठं (दुसरी सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (तीन नवीन खाजगी विद्यापीठे स्थापन करणेबाबत)  
(10) महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयक, 2024 (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग) (अपराधांच्या शिक्षेत वाढ  अधिनियमाच्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल कडक शिक्षा व दंड वाढविण्याबाबत) 
 (11) हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रदद् करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2024
( महसूल व वन विभाग) (अनधिकृत हस्तांतरण नियमित करणेबाबत)
 (12) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2024 (वित्त विभाग)
(13) महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, 2024 (महसूल व वन विभाग)
(14) महाराष्ट्र  मुल्यवर्धित कर (सुधारणा व विधीग्राह्यीकरण) विधेयक, 2024 (वित्त विभाग) 
(15) महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग) 
(16) महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(17) महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, 2024 (गृह विभाग) 


संयुक्त समितीकडे प्रलंबित


(1) महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक, 2024 (गृह विभाग) 


विधानसभेत प्रलंबित विधेयके


(1) महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) विधेयक, 2024. (महसूल व वन विभाग) (दंडाच्या कमाल मर्यादेत वाढ) 




संबंधित बातमी:


खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडेंची पोस्ट; फडणवीस, शिंदे, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, जनतेशी थेट...