Santosh Deshmukh Murder Case : "आम्ही पोलिसांच्या तपासावर आम्ही समाधानी नाहीत.  एकूण सात आरोपी आहेत असे बोलले जात आहे, मात्र त्यातील चारच अटक आहेत.  आणखी तीन आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच मुख्य सूत्रधाराला अटक करावी माझ्या वडिलाला ज्या प्रकारे मारण्यात आलं तसेच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी", अशी प्रतिक्रिया मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या कन्या वैभवी देखमुख यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलत होत्या. 


संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातीवर अधिकारी आणि न्यायालयीन चौकशी केला जाणार अशी घोषणा झाल्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी एबीपी माझावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "या तपासावर आम्ही समाधानी नाहीत एकूण एकूण सात आरोपी आहेत असे बोलले जात आहे. मात्र त्यातील चारच अटक आहेत. आणखी तीन आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच मुख्य सूत्रधाराला अटक करावी. माझ्या वडिलाला ज्या प्रकारे मारण्यात आलं तसेच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी. बीडच्या एसपींची बदली नाही तर त्यांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे. कारण ते दुसरीकडे गेल्यावर पण असच  होऊ शकते. आम्ही या कारवाईवर समाधानी नाहीत कारण आणखी आरोपी फरार आहेत, असंही वैभवी देशमुख म्हणाल्या आहेत. 


वाल्मिक कराडबद्दलचे पुरावे असतील तर कारवाई करणार -  देवेंद्र फडणवीस 


मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराड संबंधांची चौकशी करणार, वाल्मिक कराडबद्दलचे पुरावे असतील तर तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कारवाई केली जाणार...बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची पाळंमुळं खणून काढणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिली आहे. 


धनंजय मुंडे म्हणाले, माझ्या सहकाऱ्याच्या संबंधांना तर जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल आणि त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री देणाऱ्याचे देत असेल तर  परंपरेनुसार मी सदरात उपस्थित राहिलो नाही. त्या शिवाय दुसरे कुठेलेही कारण नाही. विरोधकांनी काहीतरी बोलणार...त्यावर माझ्याकडून बोलला जाणार.... त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार...जे काही असेल एकदा काय दूध का दूध पाणी का होउ द्या... मुख्यमंत्र्याच्या उत्तरातून  ते कळलं.


पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मी सुरुवातीपासून म्हणत आहे, हे घरातलं झालेलं भांडण आहे. त्यातून निर्घृण संतोष देशमुख यांची हत्या अशाप्रकारे  झाली आहे. या प्रकरणात तीव्र भावना सगळ्यांची आमची आहे. एसआयटी नेमलेली आहे. याचा तपास होणार आहे, कोण होतं काय काय होत, घटनेच्या आदल्या दिवशी काय झालं...यामध्ये मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जो काही बोलले, तो फक्त या प्रकरणात लावायचा आहे, की  यापुढे अशा प्रकरणात लावायचा आहे... माननीय मुख्यमंत्री यांनी निवेदन केलं आहे. माझ्या नावावर सदनात जो आरोप करण्यासाठी आहे.... शेवटी पोलीस तपासणार आहे. पोलीस यंत्रणा आहे, की सीआयडीकडे तपास दिला आहेत. विरोधी पक्षनेत्यानं काय बोलावं मला सांगता येत नाही... वाल्मिक नागपुरात कुठे आहे तेही सांगावे पोलिसांनी त्यांना पकडण्याचे काम केलं असतं...या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अश्या पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे...ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.